Join us

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा दिसतोय, करा गुलाब पाकळ्यांचा हा उपाय, चेहरा दिसेल गुलाबी गुलाबासारखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 18:16 IST

how to use rose petals to close open pores : rose petals for tightening pores : natural remedies to close open pores : how to shrink large pores naturally with rose petals : बिनपैशांचा घरगुती उपाय, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या करतील ओपन पोर्सची समस्या गायब...

आपल्या त्वचेवर अगदी बारीक डोळ्यांना न दिसणारी अशी छिद्र असतात. या छिद्रांच्या मदतीने आपली त्वचा श्वास घेत असते. या छोट्या छिद्रांना पोर्स (rose petals for tightening pores) असं म्हटलं जातं. त्वचेच्या अनेक समस्यांपैकी 'ओपन पोर्स' ही अगदी कॉमन आणि सगळ्याचजणींना त्रासदायक वाटणारी समस्या आहे. त्वचेवर असणारी ही छिद्र काही कारणांस्तव उघडतात आणि छिद्र मोठी दिसायला लागतात. ओपन पोर्समुळे आपल्या चेहऱ्यचा संपूर्ण लूक बदलून जातो, ओपन पोर्समुळे (Best Natural & Effective Home Remedies for Open Pores) चेहऱ्यावर खडबडीतपणा दिसतो. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर असे ओपन पोर्स (How to get rid of large pores) दिसू लागले की, चेहऱ्यावरची कोमलता, नाजूकपणा जाऊन चेहरा जास्तच वयस्कर वाटू लागतो. विशेषत: गालावर आणि नाकाच्या भागात तर ओपन पोअर्स (Natural Home Remedies for Open Pores) खूप जास्त स्पष्टपणे दिसून येतात. ओपन पोर्समुळे त्वचेवर धूळ, तेल आणि डेड स्किन जमा होते, ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्ससारख्या समस्या अधिक जास्त प्रमाणात वाढतात(how to use rose petals to close open pores).

त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि घरातील इतर नेहमीच्या वापरातील पदार्थांच्या मदतीने ओपन पोर्स अगदी सहजपणे क्लीन करु शकतो. ओपन पोर्स वेळच्यावेळी स्वच्छ करणे तितकेच महत्वाचे असते. यासाठीच आपण हा खास घरगुती उपाय घरच्याघरी नक्की करुन पाहू शकतो. 

ओपन पोर्स बंद करण्याचा सोपा घरगुती उपाय... 

ओपन पोर्स घरच्याघरीच बंद करण्याचा सोपा घरगुती उपाय thatsaiangel या इंस्टाग्राम व्हिडिओवरून शेअर करण्यात आला आहे. ओपन पोर्स बंद करण्यासाठी घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला कपभर ताज्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, तुरटीचा छोटा खडा, ग्लासभर पाणी आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस इतक्या ४ गोष्टींची गरज लागणार आहे.   

अथिया शेट्टी केसांना लावते तिच्या आईने तयार केलेलं हे पारंपरिक तेल! म्हणून तिचे केस दाट-लांबसडक...

नेमका उपाय काय आहे ? 

त्वचेवरील ओपन पोर्स बंद करण्यासाठी सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून गरम करून घ्यावे. आता या पाण्यांत कपभर गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात. हे पाणी २ ते ३ मिनिटे व्यवस्थित उकळवून घ्यावे. पाणी उकळवून झाल्यावर ते एका भांड्यात काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. पाणी थंड झाल्यावर बर्फाच्या ट्रे मध्ये यातील अर्धे पाणी ओतून ठेवावे व अर्धे पाणी एका बाटलीत भरून स्टोअर करून ठेवावे.

पावसाळ्यात होणारी केसगळती थांबवणारं जादुई तेल! एरंडेल तेलात मिसळा २ पदार्थ - केस व स्काल्प राहील निरोगी...

३ ते ४ तास फ्रिजरमध्ये ठेवून बर्फ तयार झाल्यावर हा तयार बर्फ एका बाऊलमध्ये घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्यांचे पाणी ओतावे. याचबरोबर त्या बाऊलमध्ये, तुरटीचा छोटा खडा, लिंबाचा रस घालावा. आता या तयार पाण्यांत चेहरा संपूर्णपणे भिजवून घ्यावा असे ७ ते ८ वेळा सलग करावे. हा उपाय आठवड्यातून किमान २ वेळा तरी करावा. हा उपाय केल्यास त्वचेवरील ओपन पोर्स नैसर्गिकरित्या बंद होण्यास मदत होते. अशाप्रकारे आपण कोणत्याही क्रीम किंवा आर्टिफिशियल उपायांशिवाय अगदी सहजपणे घरच्याघरीच त्वचेवरील ओपन पोर्स सहज बंद करू शकतो. 

ओपन पोर्स बंद करण्यासाठी हा उपाय कसा फायदेशीर ? 

१. तुरटी :- तुरटीमध्ये असणारे औषधी गुणधर्म त्वचेचे ओपन पोर्स टाईट करण्यास मदत करतात.  

२. गुलाबाच्या पाकळ्या :- गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म ओपन पोर्स नैसर्गिकरित्या बंद करण्यास मदत करतात. 

३. लिंबाचा रस :- लिंबामध्ये नैसर्गिक सिट्रिक अ‍ॅसिड असतं, जे चेहऱ्यावरील जास्त तेल शोषून घेतं आणि ओपन पोर्स वाढू देत नाही.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय