वय वाढू लागले की, त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो.(Night skin care) वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्वचेची काळजी घ्यायला हवी.(skin care tips) हल्ली कमी वयातच अनेकांना त्वचेच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्वचा कोरडी पडणे, पिंपल्स, मुरुमे, डाग, फोड किंवा पिंग्मेंटेशनचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.(wrinkle removal remedy) सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागडे ब्यूटी ट्रिटमेंट्स, केमिकल्स उत्पादने लावतो, ज्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो. (dark spots treatment)
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्वचेवर काहींना काही लावत असतो. पण यामुळे त्वचा अधिक निस्तेज होऊ लागते.(night skin care routine) स्वयंपाकघरातील काही खास उपाय झोपण्यापूर्वी केल्यास आठवड्याभरात आपली त्वचा ग्लो करु लागेल. इतकेच नाही तर सुरकुत्या आणि काळपट चेहरा गोरा होण्यास मदत होईल.
कोंड्यामुळे टाळूला खाज येते- जखमा होतात-खपल्या धरतात? केस धुण्यापूर्वी १ काम करा, कोंडा जाणारच
पलक बजाज या कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. ती म्हणते महागड्या क्रीमपेक्षा रात्री झोपण्यापूर्वी खास उपाय केला तर नैसर्गिकरित्या त्वचेवरील चमक वाढेल. यासाठी आपल्याला तांदूळ, पाणी, कोरफडीचा गर आणि खोबऱ्याच्या तेल घ्यायचे आहे. यासाठी आपल्याला २ चमचे तांदूळ २ तास पाण्यात भिजवावे लागतील. आता एका वाटीमध्ये कोरफडीचा गर आणि नारळाचे तेल घाला. हे व्यवस्थित मिसळून त्यात भिजवलेल्या तांदळाचे पाणी घाला. या तिघांची एकत्र पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट रात्रभर चेहऱ्यावर लावायला हवी. सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवा.
तांदळाचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्या त्वचेला उजळवण्यास मदत करते. तसेच टॅनिंगची समस्या सुधारण्यास आणि त्वचेचा रंग एकसारखा करण्यास मदत करते. कोरफडीचा गर त्वचेला हायड्रेट ठेवते. यामुळ त्वचेची जळजळ टाळता येते. नारळाचे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चयराझ करते. तसेच कोरड्या त्वचेची समस्या दूर करते.