सुंदर, दाट आणि लांबसडक केस प्रत्येकीला आवडतात. केसांचे आरोग्य व सौंदर्य जपण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो परंतु तरीही केसांच्या अनेक समस्या आजकाल अनेकींना सतावतात. केसांच्या अनेक समस्यांपैकी केस पातळ होणे, केस गळणे, केस पांढरे होणे या फारच कॉमन समस्या आहेत. केसांच्या या अनेक समस्या सोडवण्यासाठी आर्टिफिशियल उपायांपेक्षा घरगुती - नैसर्गिक उपाय अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर ठरतात. आजच्या काळात आपल्यापैकी अनेकजणी पुन्हा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपायांकडे वळताना दिसतात, त्यामधीलच एक नैसर्गिक उपाय म्हणजे रिठा...रिठामध्ये नैसर्गिक क्लिन्सिंग गुणधर्म असतात, जे केस आणि स्काल्प स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. पूर्वीच्या काळी महिलांमध्ये रिठा, शिकेकाई आणि आवळा वापरून केस धुण्याची पद्धत खूप लोकप्रिय होती. रिठापासून घरच्याघरीच नैसर्गिक शाम्पू तयार करून केसांना निरोगी, चमकदार आणि मजबूत करता येऊ शकते(how to use reetha for hair growth).
केसांसाठी रिठा हा एक असा घटक आहे, जो कोणत्याही हानीकारक केमिकलशिवाय केसांना मुळापासून स्वच्छ करतो आणि त्यांना नैसर्गिक चमक देतो. रिठ्याला 'नैसर्गिक शाम्पू' का म्हणतात आणि तो वापरल्याने केसांमध्ये (How to make reetha herbal shampoo for healthy hair) काय जादू होऊ शकते? तसेच, घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने रिठा शाम्पू कसा तयार करायचा याचे सिक्रेट पाहूयात.
रिठाचा घरगुती शाम्पू कसा तयार करायचा?
आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या रिठ्यापासून घरगुती शाम्पू तयार करण्यासाठी आपल्याला १० ते १२ रिठा आणि २ ते ३ ग्लास पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. आपल्या आवडीनुसार आपण आवळा आणि शिकेकाई देखील वापरू शकता.
एकच प्लाझो स्टाईल ८ - उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंगमुळे ट्रिक, लूक दिसेल लय भारी...
सर्वात आधी रिठ्यांमधील बिया काढून टाका आणि रिठा थोडे कुस्करून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे रिठे (आणि आवळा-शिकाकाई असल्यास) रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी मंद आचेवर चांगले उकळू द्या. पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. पाणी उकळताना रिठ्याचा फेस तयार होईल. पाणी थोडे घट्ट झाले की गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर हाताने रिठे चांगले मॅश करून घ्या आणि गाळणीने पाणी गाळून घ्या. तुमचा १००% नॅचरल रिठा शाम्पू तयार आहे.
हा नैसर्गिक रिठा शाम्पू वापरण्याची योग्य पद्धत...
सर्वात आधी केस पूर्णपणे ओले करा. हा तयार केलेला घरगुती शाम्पू केसांना लावून ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हा शाम्पू जास्त फेस देत नाही, पण केसांची स्वच्छता उत्तम करतो. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
जाडजूड मांड्या-पोटाचा घेर कमी करतो शेवग्याच्या पानांचा उपाय, वेटलॉससाठी शेवगा असरदार...
केसांसाठी रिठा शाम्पू वापरण्याचे फायदे...
१. रिठामध्ये सॅपोनीन नावाचे नैसर्गिक घटक असतात, जे स्काल्पवरील घाण, तेल आणि धूळ साफ करण्यास मदत करतात. त्यामुळे केस केमिकलशिवाय स्वच्छ होतात.
२. रिठा स्काल्प स्वच्छ ठेवतो आणि केसांच्या मुळांना पोषण देतो. त्यामुळे केस मजबूत होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
केस गळून टक्कल पडण्यापूर्वी करा 'हा' उपाय! केळीची साल केसांवर 'अशी' लावा चटकन...
३. रिठामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे स्काल्पवरील कोंडा आणि खाज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
४. रिठाचा नियमित वापर केल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस नैसर्गिकरित्या चमकदार दिसू लागतात.
५. रिठा, शिकेकाई आणि आवळा यांचे मिश्रण केसांना नैसर्गिक पोषण देऊन केस काळेभोर आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. डोळ्यांत रिठाचे पाणी जाऊ देऊ नका.
२. खूप कोरडे केस असतील तर वापरल्यानंतर हलके तेल लावा.
नियमितपणे रिठाचा नॅचरल शाम्पू वापरल्यास केसांवरील केमिकलचा वापर कमी होऊन केस अधिक निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत मिळू शकते.
Web Summary : Reetha, a natural cleanser, makes hair healthy and strong. Prepare reetha shampoo at home using reetha, amla, and shikakai. Boil the ingredients, mash, and strain. Massage into wet hair, then rinse. This shampoo cleanses, nourishes, and reduces dandruff, promoting shiny, healthy hair.
Web Summary : रीठा, एक प्राकृतिक क्लींजर, बालों को स्वस्थ और मजबूत बनाता है। रीठा, आंवला और शिकाकाई का उपयोग करके घर पर रीठा शैम्पू तैयार करें। सामग्री को उबालें, मैश करें और छान लें। गीले बालों में मालिश करें, फिर धो लें। यह शैम्पू साफ करता है, पोषण देता है और रूसी को कम करता है, जिससे बाल चमकदार और स्वस्थ होते हैं।