Join us

संत्र्याची साल करेल कमाल! हिवाळ्यात 'या' पद्धतीने लावा त्वचेवर, डाग- पिंपल्स होतील कमी- टॅनिंगही जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2025 15:56 IST

orange peel benefits for skin: orange peel face pack for glowing skin: how to remove tanning naturally: संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी आपण त्वचेला लावल्यास त्वचेला नॅचरल ग्लो मिळेल.

ऋतू बदलला की, त्याचा आपल्या त्वचेसह आरोग्यावर परिणाम पाहायला मिळतो. सध्या ऊन- पावसामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.(skin care tips) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात कधी ऊन किंवा गारवा जाणवू लागला आहे.(Beauty tips) ज्यामुळे त्वचा कोरडी, तेलकट, निस्तेज किंवा खडबडीत होते. थंडीमुळे त्वचेतील ओोलावा कमी होतो आणि नैसर्गिक चमक हरवून जाते. (orange peel benefits for skin)या काळात त्वचा काळी पडते, स्किन टॅनही होते अशावेळी आपण महागातले क्रीम्स, काही ब्यूटी प्रोडेक्ट्स वापरतो.(orange peel face pack for glowing skin) ज्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो. पण अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल.(how to remove tanning naturally) हिवाळ्यात बाजारात आपल्याला संत्री पाहायला मिळतात. रसाळ, आंबट-गोड संत्री खाल्ल्यानंतर त्याची साल आपण फेकून देतो.(home remedies for pimples and dark spots) ही साल फेकून देण्याऐवजी आपण त्वचेला लावल्यास त्वचेला नॅचरल ग्लो मिळेल. (orange peel powder for face)

केसांना डाय नकोच! स्वयंपाकघरातील ४ पदार्थ अकाली पिकणारे केस करतील काळेभोर- पांढरे केस धाग्यासारखे चमकणार नाहीच..

संत्री जितकी खायला चविष्ट असतात तितकीच त्याची साल जास्त उपयुक्त असते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतं. यात असणारं नैसर्गिक आम्ल त्वचेचा वरचा थर बाहेर काढते आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. आपल्या चेहऱ्यावर डाग, ठिपके, पिंपल्स किंवा पिग्मेंटेशन असेल तर संत्र्याची साल उन्हात २ ते ३ दिवस वाळवा. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून याची पावडर बनवा. 

फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला १ चमचा संत्र्याची साल, १ चमचा दही किंवा गुलाबजल आणि चिमूटभर हळद लागेल. हे तिन्ही घटक व्यवस्थित मिसळून घ्या. आपल्या चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून सुकू द्या. नंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ करा. नियमितपणे किंवा आठवड्यातून दोन वेळा हा फेस पॅक वापरल्यास मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल. तसेच त्वचाही चमकेल.  

English
हिंदी सारांश
Web Title : Orange Peel Benefits: Reduce blemishes, pimples, and tan this winter.

Web Summary : Use orange peel for glowing skin! Its vitamin C and antioxidants remove dead skin, reduce blemishes, and fight tanning. Mix orange peel powder with yogurt/rosewater and turmeric; apply for 15 minutes for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी