आजकाल सुंदर दिसण्यासाठी आपण काय नाही करत? महागडे क्रीम, सीरम, फेस ऑइल, ट्रीटमेंट्स... महिन्याला हजारो रुपये स्किनकेअरवर खर्च करतो.(benefits of orange peel for face) पण तरीही त्वचा कोरडी, निस्तेज, डाग किंवा खड्डे पडलेले दिसतात.(DIY skincare at home) अशावेळी आपण वैतागून म्हणतो, इतके पैसे खर्च करुनही उपयोग काय? तेव्हा आपल्याला आठवण येते ती आजीची. ज्यांच्या काळात ना ब्रँडेड क्रीम होत्या, ना पार्लर.. तरीही त्वचा सुंदर, मऊ आणि तेजस्वी दिसायची. (traditional beauty remedies)
आजी आपल्याला कायमच घरगुती उपाय सांगते. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे त्वचेची काळजी घेतात. त्यातील खास गोष्ट म्हणजे संत्र्याची साल. (natural face care tips) आपण संत्री खाऊन त्याचे साल फेकून देतो.(chemical free skincare) पण या सालीमध्ये नैसर्गिक सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. व्हिटामिन सी ने भरलेली संत्र्याची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे आपली त्वचा उजळते, डाग-खड्डे कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं.
आईच काय अगदी बाबालाही जमतील असे परफेक्ट धपाटे! पाहा कोथिंबिरीच्या धपाट्यांची झटपट ५ मिनिट्स रेसिपी
संत्र्याच्या सालीपासून लेप, उटणे किंवा नैसर्गिक सीरम बनवून आपण ते चेहऱ्याला लावू शकतो. यात कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही. सध्याच्या धावपळीच्या जगात आपण झटपट परिणामासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरतो. पण त्याचा परिणाम त्वचेवर उलटा होतो.
संत्र्याच्या सालीचे सीरम बनवण्यासाठी आपल्याला १ संत्र्याची साल, १ लिंबाची साल, पपईची साल, कोरफडीचा गर, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागेल. हे सीरम बनवण्यासाठी आपल्याला संत्री, लिंबू आणि पपईची साले थंड पाण्यात १ तास भिजवा. त्यात पाणी घालून उकळवा. हे पाणी थोडे घट्ट झाले की गाळून घ्या. त्यात कोरफडीचा गर, ग्लिसरीन, बदामाचे तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. हे सीरम जास्तीत जास्त २ आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकतो. या सीरमला वास येत असेल तर त्वचेला लावू नका.
नियमितपणे हे सीरम त्वचेला लावल्यास आपली त्वचा उजळण्यास मदत होते. काळे डाग हळूहळू कमी होतील. कोलेजन वाढल्यामुळे त्वचा मजबूत आणि तरुण दिसते. जे त्वचेला हायड्रेट करते,ज्यामुळे त्वचेचा पोत गुळगुळीत देखील होते.
