Join us
Daily Top 2Weekly Top 5

कडूकडू कडुनिंब त्वचेसाठी साखरेहून गोड-सोन्याहून चमकदार! ७ दिवसांत पिंपल्स-काळे डाग गायब करणारा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 16:30 IST

Neem for skin: Neem for pimples: Remove dark spots naturally: आपली त्वचा केवळ ७ दिवसांत काचेसारखी स्वच्छ आणि चमकदार व्हावी असं वाटतं असेल तर कडुनिंबाची पानं कशी चेहऱ्यावर लावायला हवी पाहूया.

चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग दिसू लागले की आपला आत्मविश्वास सहज कमी होऊ लागतो. आजूबाजूला वावरणाऱ्या मुलींकडे पाहिलं की त्यांची त्वचा एकदम ग्लो दिसू लागते. आरशात पाहिलं की त्वचेवर भरपूर पिंपल्स, डाग किंवा निस्तेजपणा दिसतो.(Neem for skin) सध्याच्या धावपळीच्या जीवनात, वाढते प्रदूषण आणि बदलत्या आहारशैलीमुळे त्वचेच्या समस्या जणू पाचवीलाच पुजलेल्या असतात.(Neem for pimples)अनेकदा आपण महागडी क्रीम्स, सीरम आणि पार्लरमधील फेशियलवर हजारो रुपये खर्च करतो, पण याचा परिणाम तात्पुरता असतो किंवा कधीकधी त्यातील रसायनांमुळे त्वचेचे नुकसान होते.(Remove dark spots naturally) अशा वेळी आपल्याला गरज असते काही आयुर्वेदिक उपायांची. आयुर्वेदात कडुलिंबाला सर्व रोगांवरचे औषध मानले जाते. कडू वाटणारा हा कडुनिंब आपल्या सौंदर्यासाठी मात्र अत्यंत गोड ठरू शकतो. आपली त्वचा केवळ ७ दिवसांत काचेसारखी स्वच्छ आणि चमकदार व्हावी असं वाटतं असेल तर कडुनिंबाची पानं कशी चेहऱ्यावर लावायला हवी पाहूया. 

अळशी- कॉर्न स्टार्चचा भन्नाट उपाय, घरीच करा महागडी केरेटिन ट्रिटमेंट, कायमच्या विसरा केसांच्या सर्व समस्या...

कडुनिंबाच्या पानात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे आपल्या त्वचेवरील ओपन पोअर्सला क्लिन करुन त्वचा डिटॉक्स करतात. कडुनिंबाच्या पानांचा वापर करण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी करा. त्यात कडुनिंबाची पाने घाला. काही मिनिटे उकळवा. ही वाफ चेहऱ्यावर घ्या. यामुळे त्वचा आणि श्वासोच्छवास घेण्यास फायदा होईल. यात असणारे बॅक्टेरिया चेहऱ्यावरील मुरुमे कमी करण्यास आणि त्वचेचे छिद्र खोलवर साफ करण्यास, त्वचेची जळजळ शांत करण्यास मदत करतात. 

महागडी पैठणी नेसली की बोंगा दिसू नये म्हणून ५ टिप्स, १५ मिनिटांत नेसा पैठणी चापूनचोपून

 

आपण आपल्या चेहऱ्यावर कडुनिंबाच्या पानांचा टोनर म्हणून उपयोग करु शकतो. हे मुरुम, डाग आणि तेलकट त्वचेसाठी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. कडुनिंबाची ताजी पाने वाटून त्याची पेस्ट बनवा. त्यात एक चमचा दही मिसळा. दही त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि कडुनिंब जंतूंना नष्ट करते. हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. कोणताही नैसर्गिक उपाय करण्यापूर्वी 'पॅच टेस्ट' नक्की करा. हा उपाय करत असताना भरपूर पाणी प्या आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा, ज्यामुळे आपल्याला लवकर फरक जाणवेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Neem for flawless skin: A 7-day pimple and dark spot solution.

Web Summary : Neem offers a natural solution for pimples and dark spots. Its antibacterial properties cleanse pores and detoxify skin. Use neem steam or a neem and yogurt face pack for a clearer, brighter complexion in just 7 days.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी