Join us  

केस धुण्याआधी १ पदार्थ केसांना लावा; जावेद हबीबनं सुचवला खास उपाय-घनदाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 7:06 PM

How To Use Mustard Oil In Hair Care Tips By Jawed Habib : केसांना केस लावल्याने स्काल्प मॉईश्चराईज राहण्यास मदत होते. याशिवाय केसांची मूळ मजबूत होतात.

केस लांब, हेल्दी, शायनी असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी लोक केसांवर हजारो रूपये खर्च करतात. महागड्या हेअर ट्रिटमेंट्स घेतात. (Hair Care Tips) प्रोडक्टसचा वापर केल्याने केसांची गुणवत्ता खराब होते. याचा  पॉझिटिव्ह रिजल्ट दिसून येतो. हेल्दी आणि शायनी केसांसाठी हेअर एक्सपर्ट् जावेद हबीब यांनी इंस्टाग्रामवर एक उपाय शेअर केला आहे. (How To Use Mustard Oil In Hair Care Tips By Jawed Habib)

किचनमधील काही पदार्थ केसांच्यां वाढीसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. (Tips To Oil Hair The Right Way To Jaweb Habib) जावेद हबीब सांगतात की केस धुण्याच्या १० मिनिटं आधी केसांना काही लावल्याने केस हेल्दी आणि शायनी होतील. ४ आठवडे हा उपाय केल्याने फरक दिसून येईल. (Mustard Oil Is The Best For Your Hair)

केसांना तेल लावण्याचे फायदे

केसांना केस लावल्याने स्काल्प मॉईश्चराईज राहण्यास मदत होते. याशिवाय केसांची मूळ मजबूत होतात. याशिवाय नॅच्युरल मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच केसांना तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. जुन्या काळी लोक केसांना तेल लावून मसाज करायच्या.  ज्यामुळे केसांना पोषण मिळते याशिवाय केस लवकर पांढरे होणं टाळता येतं.

१०० वर्ष आयुष्य हवंय? निरोगी दीर्घायुष्यासाठी सद्गुरू सांगतात खास उपाय; भरपूर आयुष्य वाढेल

हेअर एक्सपर्ट जावेद हबीब सांगतात आवळा खाल्ल्याने केस मजबूत होण्यास मदत होते. हा एक नॅच्युरल इन्ग्रेडींएंट आहे ज्यामुळे केस आतून मजबूत होण्यास मदत होते. तुम्ही आवळा कच्चा खाऊ शकता किंवा आवळ्याचा  ज्यूस करून पिऊ  शकता किंवा आवळा कॅन्डीचे सेवन करा. 

ग्रीन टी चे फायदे तुम्हा सर्वांनाच माहिती असतील. यामुळे वजन कमी होण्यासह त्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे केस दाट राहतात. जावेद हबीब सांगतात की जर तुम्ही रोज ग्रीन टी पित असाल तर केसांची रिग्रोथ होईल आणि केस गळणं उद्भवणार नाही आणि डोक्यावर नवे केस परत येतील.

कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा साठा आहेत ६ पदार्थ, रोज खा-२०६ हाडांना येईल ताकद

जर तुम्हाला केस गळती थांबवायची असेल तर तुम्ही एलोवेरा जेलचा केसांवर उपयोग करू शकता. एलोवेरा जेल किंवा ताजी एलोवेराची पानं किंवा पल्प काढून केसांवर मसाज करा ज्यामुळे केसांची रिग्रोथ होईल. याशिवाय कांद्यात सल्फर असते ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. ब्लड सर्क्युलेशन चांगले ठेवल्याने केसांची वाढ होण्यासही मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी