Lokmat Sakhi >Beauty > केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...

केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...

how to use methi water for hair growth : fenugreek water benefits for hair : methi seeds water for long and thick hair : fenugreek water for hair fall control : how to apply methi water on hair : केसांसाठी फायदेशीर असणारे औषधी व आयुर्वेदिक मेथी दाण्यांचे पाणी एकदा वापरुन तर पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 19:03 IST2025-09-11T17:59:28+5:302025-09-11T19:03:43+5:30

how to use methi water for hair growth : fenugreek water benefits for hair : methi seeds water for long and thick hair : fenugreek water for hair fall control : how to apply methi water on hair : केसांसाठी फायदेशीर असणारे औषधी व आयुर्वेदिक मेथी दाण्यांचे पाणी एकदा वापरुन तर पाहा..

how to use methi water for hair growth fenugreek water benefits for hair methi seeds water for long and thick hair fenugreek water for hair fall control how to apply methi water on hair | केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...

केस धुण्यासाठी फक्त शाम्पू नाही, वापरा 'हे' पाणी; केसगळती थांबून नवीन केस वाढतील वेगाने...

केसांशी संबंधित अनेक समस्या आजकाल बहुतेक सगळ्यांनाचं त्रास देतात. कुणाच्या केसांची वाढच खुंटते तर कुणाची केसगळतीच थांबत नाही, अशा एक ना अनेक समसस्यांमुळे केसांचा नैसर्गिक पोत खराब होतो. केसांच्या दिवसेंदिवस वाढत्या समस्यांमुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य व आरोग्य हळूहळू बिघडू लागते. केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे (how to apply methi water on hair) उपाय करतो. केसांना वेळच्यावेळी तेल (fenugreek water for hair fall control) लावणे ते स्वच्छ धुणे अशा काही बेसिक गोष्टी आपण करतोच. परंतु सुंदर व मजबूत केसांसाठी केस फक्त शाम्पूचा वापर करुन धुणे इतकेच पुरेसे नसते. केसांचे आरोग्य (methi seeds water for long and thick hair) व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण शाम्पू सोबतच इतर काही नैसर्गिक पदार्थांचा देखील वापर करु शकतो. केसांच्या अनेक समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी, आपण शाम्पू सोबतच मेथी दाण्याच्या पाण्याचा देखील वापर करु शकतो. 

नैसर्गिक पद्धतीने केसांची निगा राखायची असेल तर मेथी दाणे हा अतिशय उत्तम उपाय आहे. मेथी दाण्यांमध्ये प्रथिने, लोह, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांना मजबूती देतात, केसगळती कमी करतात आणि केसांना चमकदार करतात. विशेषतः मेथी दाण्यांच्या पाण्याने केस धुतल्यास केस मऊसर, दाट आणि निरोगी होतात. त्यामुळे मेथी दाण्यांच्या पाण्याचा हा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो. केसांची निगा राखण्यासाठी मेथी दाण्याच्या पाण्याचा वापर कसा करावा, ते पाणी कसे तयार करावे आणि त्याचे फायदे काय ते पाहूयात... 

केसांसाठी फायदेशीर असे मेथी दाण्याचे पाणी... 

केसांसाठी मेथी दाण्याचे पाणी कसे तयार करावे व त्यांचे फायदे नेमके काय आहेत याची माहिती इंस्टाग्रामवरील beautifulyoutips या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. केसांसाठी मेथी दाण्यांचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला १ ग्लास पाणी, ३ ते ४ टेबलस्पून मेथी दाणे, १ टेबलस्पून तुरटी पावडर, १ टेबलस्पून तांदूळ पाण्यांत भिजवून घेतलेले इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

मेथी दाण्यांचे पाणी कसे तयार करावे ? 

सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात मेथी दाणे, तुरटी पावडर व पाण्यात भिजवून घेतलेले तांदूळ व त्याचे पाणी असे सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून त्यावर झाकण ठेवून रात्रभर पाण्यांत सगळे घटक व्यवस्थित भिजू द्यावेत. दुसऱ्या दिवशी हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये घालून एकत्रित वाटून घ्यावे. तयार मिश्रण एका दुसऱ्या बाऊलमध्ये गाळणीने गाळून घ्यावे. या गाळून घेतलेल्या मिश्रणात २ टेबलस्पून नेहमीच्या वापरातील शाम्पू घालावा. मग हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. केस धुण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी तयार आहे. 

मेहेंदी चोपडूनही केसांना रंगच येत नाही ? 'अशी' भिजवा मेहेंदी, केस दिसतील कलर केल्यासार‌खे सुंदर...

याचा वापर कसा करावा ? 

केस धुण्यासाठी आपण मेथी दाण्याच्या पाण्याचा वापर शाम्पू प्रमाणेच करु शकता. यासाठी, थोडे मिश्रण हातात घेऊन ते थेट केसांवर शाम्पूप्रमाणेच लावून घ्यावे. मग २ ते ३ मिनिटे हे मिश्रण केसांवर तसेच राहू द्यावे, मग हलकेच बोटांच्या मदतीने चोळून केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा अशा मेथी दाण्याच्या पाण्याने केस धुतल्यास केसांच्या अनेक समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. याचबरोबर नवीन केस उगवतील तसेच त्यांची वाढ देखील दुप्पट वेगाने होईल. 

भारती सिंग केसांना लावते घरगुती तेल! केस होतील लांबसडक, घनदाट - पाहा हेअर केअर सिक्रेट... 

केसांसाठी 'हे' पाणी वापरण्याचे फायदे... 

१. मेथी दाणे :-  मेथी दाण्यांचे पाणी केसांमधील कोंडा कमी करते, केसांची वाढ होण्यास मदत करते आणि केस चमकदार बनवते.

२. तुरटी :- तुरटीच्या पाण्याने केस धुतल्यास केसांमधील तेलकटपणा कमी होतो आणि केस स्वच्छ व निरोगी राहतात.

३. तांदूळ :- तांदळाचे पाणी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.


Web Title: how to use methi water for hair growth fenugreek water benefits for hair methi seeds water for long and thick hair fenugreek water for hair fall control how to apply methi water on hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.