Join us

तांदळाचेच नाही तर ‘डाळीचं पाणी’ सुद्धा देतं जबरदस्त ग्लो! दिवाळीत पार्लरलला करा गुडबाय- घरगुती ब्यूटी सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2025 09:30 IST

dal water for glowing skin: lentil water benefits for skin: homemade beauty tips: डाळ आणि तांदळाच्या पाण्यामुळे चेहऱ्याला कसा फायदा होईल पाहूया.

वाढते प्रदूषण, चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर जितका परिणाम होतो. तितकाच आपल्या त्वचेवर होतो.(homemade beauty tips) आपल्या त्वचेची काळजी घेणे सध्या जास्त गरजेचे झाले आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, कमी वयात फोडांचे त्रास, सुरकुत्या पडतात.(dal water for glowing skin) त्यासाठी त्वचेची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. तांदळाचं पाणी हे केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. हे आपल्यापैकी अनेकांना माहित आहे.(Diwali skincare tips) पण डाळीचं पाणीही तितकंच उपोयगी ठरतं?(rice water vs dal water for face)आपल्या स्वयंपाकघरात दररोज शिजवला जाणारा पदार्थ डाळ ही केवळ प्रोटीनने भरलेली नसते. पण तिच पाणी हे नैसर्गिक स्किन टॉनिक म्हणून आपल्याला वापरता येईल.(chemical free skincare) दिवाळीच्या दिवसांत सतत तेलकट पदार्थ खाऊन, कमी झोपेमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते.(natural glow at home) अशावेळी डाळीचं पाणी आपल्या स्किनला नैसर्गिक पोषण देण्याचे काम करेल. डाळ आणि तांदळाच्या पाण्यामुळे चेहऱ्याला कसा फायदा होईल पाहूया. 

नारळाचं तेल लावल्यानं कमी होतात स्ट्रेच मार्क्स? डॉक्टरांचा सल्ला, ‘असे’ लावा नारळाचे तेल

भात शिजवण्यापूर्वी त्यात पाणी घातले जाते. त्यानंतर त्यातील पांढरे पाणी हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. जे निरोगी आणि मऊ त्वचेसाठी चांगले आहे. तांदळाच्या पाण्यात वृद्धत्व कमी करणारे गुणधर्म असतात.जे आपल्या चेहऱ्यावरील निस्तेजपणा दूर करण्यास मदत करतात. 

तांदळाच्या पाण्याप्रमाणे मसूर डाळीचे देखील त्वचेला अधिक फायदे आहेत. डाळ शिजवून त्याचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यात असणारे प्रथिने आणि खनिजे त्वचेसाठी चांगले आहे. यात त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात. चेहऱ्याला चमक मिळवण्यासाठी आपण मसूर किंवा मुगाच्या डाळीचा फेस पॅक चेहऱ्याला लावू शकतो. 

डाळीचे पाणी हे त्वचेसाठी केमिकल फ्री आहे. त्यामुळे अति संवेदनशील त्वचेसाठीही नुकसानदायक ठरत नाही. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डाळीचं पाणी चेहऱ्यावर लावल्याने स्किनमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dal water for Diwali glow: Goodbye parlor, hello home secrets!

Web Summary : Pollution impacts skin, causing issues like pimples. Rice and dal water are beneficial. Dal water is a natural skin tonic, providing nourishment. It helps repair skin cells and adds natural radiance. Using dal water keeps skin moisturized and glowing.
टॅग्स :दिवाळी २०२५ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी