सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्याच मागे कोणत्या ना कोणत्या लग्नाची गडबड आहेच. आता आपल्या रोजच्या गडबडीत आपण एवढे अडकून गेलेलो असतो की त्वचेची काळजी घ्यायला पुरेसा वेळही मिळत नाही. म्हणूनच अशावेळी पुढे सांगितलेले अगदी सोपे २ उपाय जाणून घ्या. हे उपाय जरी तुम्ही घरच्याघरी नियमितपणे केले तरी त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. हे उपाय करण्यासाठी आपण केशराचा वापर करणार आहोत. केशर त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरते. पण त्याचा कसा वापर करून घ्यायचा, हेच अनेकांना माहिती नसते. म्हणूनच ही माहिती पाहा आणि घरच्याघरी अगदी स्वस्तात मस्त रिझल्ट देणारे उपाय करून पाहा..(skin care tips using kesar or saffron)
केशराचं नाईट क्रिम
केशरापासून घरच्याघरी तयार केलेलं नाईटक्रिम जर चेहऱ्याला लावलं तर इतर कोणतेही महागडे क्रिम वापरणं सोडून द्याल, एवढा चांगला परिणाम त्वचेवर दिसून येईल. त्यासाठी केशराच्या १० ते १२ काड्या एका पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळा आणि काही सेकंदासाठी तव्यावर गरम करून घ्या.
व्हेज बिर्याणीही लागेल चमचमीत-पाहा पनीर दम बिर्याणीची हॉटेलपेक्षा भारी रेसिपी! बिर्याणीची अस्सल चव
यानंतर केशर काड्या एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यामध्ये २ चमचे गुलाबपाणी टाकून ते १० मिनिटे झाकून ठेवा. यानंतर या मिश्रणात २ चमचे ॲलोव्हेरा जेल आणि १ चमचा बदामाचं तेल घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून काचेच्या डबीत घालून ठेवा. हे क्रिम रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावा. हे क्रिम फ्रिजमध्ये ठेवल्यास ते १० ते १५ दिवस चांगलं टिकतं. या क्रिममुळे त्वचेवर छान ग्लो येईल.
केशराचा फेसपॅक
केशराचा फेसपॅक तयार करण्यासाठी केशराच्या ८ ते १० काड्या पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून गॅसवर गरम करून घ्या. त्यानंतर एका वाटीमध्ये कच्चं दूध घालून त्यामध्ये केशराच्या काड्या १० मिनिटे भिजत घाला.
आता या दुधामध्ये १ चमचा मुलतानी माती आणि १ चमचा चंदन पावडर घाला. हा लेप चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन कमी होईल.
