Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > काळे डाग- पिंपल्स- वांग होतील गायब! 'असं' लावा जायफळ त्वचेवर, आजीबाईच्या बटव्यातील औषधी उपाय- चेहरा उजळेल

काळे डाग- पिंपल्स- वांग होतील गायब! 'असं' लावा जायफळ त्वचेवर, आजीबाईच्या बटव्यातील औषधी उपाय- चेहरा उजळेल

Home remedies for dark spots: Pimples home remedy: Ayurvedic beauty remedies: महागड्या क्रीम्स आणि केमिकल ट्रीटमेंटमुळे आपल्याला तात्पुरता फरक पडतो, पण त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2026 10:13 IST2026-02-06T16:34:47+5:302026-02-08T10:13:44+5:30

Home remedies for dark spots: Pimples home remedy: Ayurvedic beauty remedies: महागड्या क्रीम्स आणि केमिकल ट्रीटमेंटमुळे आपल्याला तात्पुरता फरक पडतो, पण त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होते.

how to use jayphal for dark spots naturally ayurvedic home remedy for face grandma remedies for clear and glowing skin natural treatment for dark spots and pigmentation | काळे डाग- पिंपल्स- वांग होतील गायब! 'असं' लावा जायफळ त्वचेवर, आजीबाईच्या बटव्यातील औषधी उपाय- चेहरा उजळेल

काळे डाग- पिंपल्स- वांग होतील गायब! 'असं' लावा जायफळ त्वचेवर, आजीबाईच्या बटव्यातील औषधी उपाय- चेहरा उजळेल

आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत. जे त्वचा उजळण्यास मदत करतात. या मसाल्याच्या डब्यात दडलेले जायफळ केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर सौंदर्याचा खजिना म्हणूनही ओळखले जाते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे चेहऱ्यावर अकाली काळे डाग, पिंपल्स आणि वांग येणे ही सामान्य समस्या झाली आहे. 
महागड्या क्रीम्स आणि केमिकल ट्रीटमेंटमुळे आपल्याला तात्पुरता फरक पडतो, पण त्वचेचे कायमस्वरुपी नुकसान होते. अशावेळी आपल्याला आठवण येते ती आजीबाईच्या बटव्यातील रामबाण औषधांची. जायफळ हे नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी- इंफ्लेमेटरी घटक आहेत. जे आपल्याला त्वचेच्या खोलवर जाऊन अनेक समस्या मुळापासून काढून टाकते. 

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला तूप लावून तर पाहा! ७ दिवसांत डाग गायब- येतो नैसर्गिक ग्लो; आयुर्वेदिक डॉक्टरांचा रामबाण उपाय

जायफळमध्ये त्वचेचा रंग उजळवण्याची आणि डाग हलके करण्याची क्षमता असते. यात असणारे औषधी गुणधर्म रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, मृत त्वचा काढून टाकण्यास देखील मदत करतात. जायफळचा वापर त्वचेवर कसा करावा पाहूया. 

जायफळ हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. कारण यात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात. तसेच दाहक-विरोधी गुणधर्म आणि वयोवृद्धाची लक्षणे कमी करणारे गुणधर्म देखील आहे. यामुळे मुरुमे, डाग, सुरकुत्या आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. 

पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी जायफळचा अर्धा तुकडा घ्या. तो दुधामध्ये घासा. दुधाचा रंग बदलल्यानंतर हे मिश्रण डाळ आणि काळ्या त्वचेवर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या, नंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे पिग्मेंटेशन, काळे डाग कमी होतील. 

त्वजेला उजळवण्यासाठी दुधाऐवजी आपण मध वापरल्याने चेहऱ्याचा निस्तेजपणा आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे चेहरा उजळतो. क्रीम बनवण्यासाठी आपल्याला जायफळची पावडर, कोरफड जेल आणि बदामाचे तेल एकत्र करावे लागेल. हे क्रीम तयार करुन रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होईल. 

जायफळ पावडर, दही आणि कॉफी पावडर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी होतात. आपण हे क्लिंजिग स्क्रब म्हणून याचा वापर करु शकतो. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.


Web Title : साफ त्वचा के लिए जायफल: दादी माँ का नुस्खा, दाग-धब्बे और मुंहासों के लिए

Web Summary : जायफल, एक रसोई मसाला, दाग-धब्बे, मुंहासे और निशान मिटाता है। इसके एंटी-इंफ्लेमेटरी गुण त्वचा को चमकदार बनाते हैं। रंजकता के लिए दूध के साथ, चमक के लिए शहद के साथ या साफ त्वचा के लिए स्क्रब के रूप में प्रयोग करें।

Web Title : Nutmeg for Clear Skin: Grandma's Remedy for Spots and Pimples

Web Summary : Nutmeg, a kitchen spice, fades spots, acne, and blemishes. Its anti-inflammatory properties promote radiant skin. Use with milk for pigmentation, honey for brightness, or as a scrub for clear skin.