सध्या केसांसंबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या सगळ्यांनाचं सतावतात. केस खूपच कमकुवत किंवा निर्जीव दिसतात, तुटतात, गळतात किंवा त्यांच्या वाढीचा वेग कमी झालाय असं अनेकदा जाणवतं. केसांच्या एक ना अनेक समस्या सतावू लागल्या की, आपण त्यांची अधिकाधिक काळजी घेतो. केसांचे हरवलेले सौंदर्य व आरोग्य परत आणण्यासाठी काही नैसर्गिक व पारंपरिक उपायच फायदेशीर ठरतात. केसांच्या समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी नैसर्गिक व पारंपरिक उपाय करण्यासाठी, बाल्कनीतील जास्वंदीचे रोप असरदार ठरते(hibiscus hair oil benefits).
खोबरेल तेल केसांसाठी वरदान मानले जातेच, पण जर त्यात जास्वंदीची फुले आणि पाने मिसळली तर हे मिश्रण केसांसाठी एक प्रकारचे अमृतच ठरते. जास्वंदामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि केसांची वाढ वेगाने होण्यास मदत करतात. खोबरेल तेल आणि जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून घरगुती हेअर ग्रोथ ऑईल कसे तयार करायचे, याची सोपी आणि परिणामकारक पद्धत पाहूयात... हे तेल केस लांब, दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करेल, ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या एकाचवेळी दूर होतील!(How to use hibiscus leaves & coconut oil for hair growth home remedy).
खोबरेल तेल आणि जास्वंद, केसांच्या वाढीसाठी जादुई तेल!
आपण खोबरेल तेल, जास्वंदीची फुले आणि पाने एकत्रित मिसळून घरच्याघरीच एक उत्तम हर्बल हेअर ऑईल तयार करू शकता. हे खास तेल फक्त केसांची वाढच जलद गतीने करत नाही, तर केसांच्या इतर अनेक समस्या दूर करण्यासही मदत करू शकते. हे मिश्रण खरोखरच केसांसाठी एक जादुई उपाय ठरु शकते. हे तेल घरच्याघरीच तयार करण्यासाठी आपल्याला ५ ते ६ जास्वंदीची ताजी फुले, २० ते २५ जास्वंदीची हिरवीगार पाने आणि २ कप शुद्ध खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
हे घरगुती जादुई तेल कसे तयार करावे ?
सर्वातआधी, जास्वंदीची ५ ते ६ फुले आणि १५ ते २० पाने घ्या. ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता, एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम होऊन उकळी यायला सुरुवात होताच, त्यात धुतलेली जास्वंदीची फुले आणि पाने टाका. हे सर्व जिन्नस मंद आचेवर १० मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे उकळू द्या, जेणेकरून जास्वंदीचे सर्व पोषक घटक तेलात उतरतील. १० मिनिटांनंतर, तेल गॅसवरून खाली उतरवा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या.
तेल लावण्याची योग्य पद्धत...
हे तेल कोणत्याही सामान्य हेअर ऑईलप्रमाणे, संपूर्ण केसांवर आणि स्कॅल्पवर व्यवस्थित लावा आणि हलकी मालिश करा. तेल लावल्यानंतर, ते साधारण एक ते दोन तास केसांमध्ये तसेच राहू द्या, जेणेकरून जास्वंद आणि खोबरेल तेलाचे पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतील. त्यानंतर, केस शाम्पूने धुवून घ्या.
सोहा अली खान रोज सकाळी पिते ‘या’ भाजीचा रस, सांगते-तिच्या दिवसभर फिट राहण्याचं सोपं सिक्रेट...
जास्वंद केसांसाठी उत्तम खजिना...
जास्वंदीच्या पानांफुलांमध्ये, प्रोटीन, अमीनो ॲसिड, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे केसांना मजबूत करण्याचे काम करतात. या घरगुती तेलाच्या नियमित वापरामुळे केसांची वाढ तर होतेच शिवाय केसांशी संबंधित अनेक समस्यांचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत मिळते.