त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक महागड्या ट्रिटमेंट्स करतो.(Skin care Tips) वय वाढू लागले की चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स येऊ लागतात. ही समस्या सामान्य असली तरी यामुळे त्वचेचं सौंदर्य कमी होते. किशोरवयीन मुलींमध्ये हार्मोन्समधील बदल, जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन, झोपेची कमतरता, ताणतणाव यामुळे समस्या अधिक वाढतात.(Home remedy for pimples) चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स आले तर थकलेला आणि डल दिसू लागतो. चेहऱ्याला हात लावल्याने पिंपल्स दुखतात, जळजळही वाढते.(Dull skin treatment)आयुर्वेदानुसार याचे सगळ्यात मोठे कारण शरीरातील पित्ताची वाढ, अतिप्रमाणात तेलकट पदार्थ खाणे यामुळे देखील पिंपल्स वाढतात.(Natural glow face mask) भरपूर पाणी आणि संतुलित आहार घेतला तर यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येते. चेहऱ्यावर सतत केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी काही घरगुती उपाय करा.
अनेकदा आपण शरीर चमकवण्यासाठी अनेक प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो. पण यामुळे बरेचदा आपल्याला त्वचेचे इन्फेक्शन होते. ज्यामुळे आपली संपूर्ण त्वचा खराब होते. शरीरावर किंवा चेहऱ्यावर साचलेली घाण साफ करण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा बेसनाच्या पिठाचा हा सोपा फेसपॅक लावून बघा.
स्पेशल फेस पॅक बनवण्यासाठी ६ ते ७ चमचा बेसन, ६ ते ७ चमचे कॉफी, ३ चमचे भाजलेली हळद, नारळाचे तेल, लिंबाचा रस, भिजवलेले तुरटीचे पाणी. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करुन याचा फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक आपण त्वचेसह संपूर्ण अंगाला लावू शकतो. ज्याच्यामुळे त्वचेवरील घाण साफ होण्यास मदत होईल. बेसन आपल्या संपूर्ण त्वचेला खोलवर स्वच्छ करते. तसेच टॅनिंग काढून टाकण्यास आणि रंग सुधारण्यास मदत करते. तर कॉफी त्वचेला एक्सफोलिएट करते आणि मृत पेशी काढून टाकते. या फेस पॅकमुळे आपल्या संपूर्ण त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल.