Join us

केस गळतात, केसात कोंडा होतो? आल्याची 'या' खास ट्रिक कराल तर विसराल महागडे प्रोडक्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:01 IST

Ginger For Hair Care : अनेक समस्या जसे की, केसगळती, केस तुटणे, केसात कोंडा अशा वेगवेगळ्या समस्या होतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी एक खास नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Ginger For Hair Care : तापमान वाढलं की, उष्णतेमुळे केस खूप जास्त खराब होतात. मग लोक वेगवेगळ्या केमिकल प्रॉडक्टचा वापर केला जातो. ज्यामुळे फायदे तर कमी होतात, पण नुकसान जास्त होतात. इतके उपाय करून पाहिलेत मग आणखी काही उपाय करून बघायला काय हरकत आहे? असे अनेक नॅचरल उपाय असतात ज्यांच्या मदतीनं तुम्ही केसांसंबंधी अनेक समस्या जसे की, केसगळती, केस तुटणे, केसात कोंडा अशा वेगवेगळ्या समस्या होतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी एक खास नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आल्यानं डॅंड्रफ पळवा

केस वाढवण्यासाठी आल्याचा वापर करणं एक फारच सोपा आणि स्वस्त उपाय आहे. ज्या लोकांना नैसर्गिक उपायाने केस लांब आणि मजबूत करायचे आहेत, त्यांच्यासाठी डॅंड्रफ मोठा अडसर आहे. यासाठी आल्याच्या रसाने १० ते १५ मिनिटे केसांची चांगली मालिश करा. याने डॅंड्रफ पूर्णपणे दूर होतील. 

केसगळती थांबेल

आजच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना केसगळतीची समस्या आहे. पण डॉक्टर म्हणतात की, दिवसातून १०० केस गळणे सामान्य बाब नाहीये. पण जर यापेक्षा जास्त केस गळत असतील तर चिंतेची बाब आहे. आलं केसांच्या मूळात घासल्याने केसांची गळती थांबते. आल्याने केसांची मालिश केल्यावर केस शॅम्पूने धुवावे.

रखरखीत केस होतील मुलायम

ज्या लोकांना नेहमी रखरखीत किंवा ड्राय केसांची समस्या असते त्यांच्यासाठी आलं फारच फायदेशीर ठरतं. आल्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, ज्याने त्वचेत सीबमची निर्मिती होणं रोखलं जातं. याने केस ड्राय होणं थांबतं. बाजारात तुम्हाला सहजपणे आल्याचं तेल मिळेल, हे तेल केसांना लावा.

केस होतात चमकदार

चमकदार आणि मोकळ्या केसांची इच्छा असलेल्यांनी लगेच आल्याचं सेवन करणं सुरू करावं. रोज सकाळी रिकाम्यापोटी एक आल्याचा छोटा तुकडा सेवन केल्याने केसांना नैसर्गिक चमक मिळते. तसेच आल्याच्या रसात ऑलिव्ह ऑइल मिश्रित करून लावल्यास अधिक फायदा होतो. हे मिश्रण रात्री एक तासांसाठी केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस धुवा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स