Join us

केस लांब- दाट आणि मजबूत करतात अळशीच्या बिया, खर्च १० रुपये-पाहा लावण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:37 IST

Flaxseed for hair : केसांची काळजी घेण्यासाठी अळशीच्या बिया कशा वापराव्या हे जाणून घेऊया. अळशीच्या बिया केसांसाठी तीन पद्धतीनं वापरू शकता. 

Flaxseed for hair : अळशीच्या बिया वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोगात आणल्या जातात. अळशीच्या बियांच्या मदतीनं हाय कोलेस्टेरॉल कमी होतं, वजन कमी होतं, ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. मात्र, याचे इतकेच फायदे नाहीत. त्वचा आणि केसांना सुद्धा अळशीच्या बियांपासून खूप फायदे मिळतात. अळशीच्या बियांमध्ये इतके पोषक तत्व असतात की, केस तुटण्याची समस्या दूर होते. तसेच केस लांब, दाट आणि मजबूत होतात. अशात केसांची काळजी घेण्यासाठी अळशीच्या बिया कशा वापराव्या हे जाणून घेऊया. अळशीच्या बिया केसांसाठी तीन पद्धतीनं वापरू शकता. 

अळशीच्या बिया केसांना लावण्याचे फायदे

- अळशीच्या बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे केसांची क्वालिटी सुधारते. 

- अळशीच्या बिया केसांवर लावल्यास केस सॉफ्ट आणि शायनी होतात. तसेच डोक्याची ड्राय त्वचाही चांगली होते.

- केसांच्या कमजोर मूळांना अळशीच्या बियांनी पोषण मिळतं. ज्यामुळे केस तुटत नाहीत.

- केसांची वाढ होण्यासही अळशीच्या बिया मदत करतात. सोबतच डोक्याच्या त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशनही चांगलं राहतं.

अळशीचं तेल

केस मजबूत करण्यासाठी तुम्ही अळशीचं तेल केसांना लावू शकता. हे तेल तुम्ही बाजारातूनही विकत आणू शकता किंवा घरी सुद्धा तयार करू शकता. हे तेल बनवण्यासाठी बिया आधी हलक्या भाजून घ्या. नंतर त्या बारीक करा. त्यात ऑलिव्ह ऑइल टाका आणि शिजवा. थंड झाल्यावर तेल बॉटलमध्ये काढून घ्या. या तेलानं केस मजबूत होतात. सोबतच केसगळतीची समस्याही दूर होते.

अळशी हेअर मास्क

अळशीच्या बियांचा हेअर मास्कही खूप फायदेशीर ठरतो. हा तयार करण्यासाठी अळशीच्या बिया ३ ते ४ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट थेट केसांना लावा. यानं केस मुलायम आणि शायनी होतील. सोबतच केसांना पोषणही मिळेल.

अळशी जेल

अळशीच्या बियांचं तुम्ही जेलही बनवू शकता. यासाठी अळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी कमी आसेवर १५ ते २० मिनिटं उकडा. थंड झाल्यावर गाळून जेल वेगळं करा. जेल केसांवर लावल्यास केस मजबूत होतील आणि दाटही होतील.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स