सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात केस अकाली पांढरे होणं ही मोठी समस्या बनली आहे. तणाव, अपुरी झोप, चुकीचा आहार, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स याचा थेट परिणाम केसांवर दिसून येतो.(dried amla for white hair) अशावेळी आपल्यापैकी अनेकजण केसांना डाय लावतात. पण केस काळे होण्याऐवजी ते अधिक पांढरे होतात. (amla for black hair)
केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्याचं काम मेलानिन नावाचं रंगद्रव्य करतं. जेव्हा या मेलानिनचं उत्पादन कमी होऊ लागतं. तेव्हा केस हळूहळू पांढरे होतात. सध्या केस पांढरे होण्याची समस्या खूप कमी वयात सहन करावी लागत आहे. अशावेळी आवळा फायदेशीर ठरु शकतो. आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वाळलेला आवळा हा व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्सने समृद्ध असतो. तो केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतो आणि नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत करतो. विशेष म्हणजे हा उपाय केवळ केस काळे करण्यापुरता मर्यादित नसून केसगळती, रुक्षपणा आणि टाळूची समस्या कमी करण्यातही उपयुक्त ठरतो. आवळ्याचा हेअर मास्क कसा बनवायचा पाहूया.
हेअर मास्क करण्यासाठी आपल्याला दही- अर्धा कप, चहा पावडर - अर्धा कप, कढीपत्ता- ५ ते ६,कडुनिंबाची पाने - ५-६, कलोंजी- १/४ कप, सुकलेला आवळा- अर्धा कप, कोरफडीचा गर- १ कप, मेथी दाणे - १/४ कप इत्यादी साहित्य लागेल. हेअर मास्क तयार करण्यासाठी सगळ्यात आधी दह्यात चहा पावडर, कढीपत्ता आणि कडुनिंबाची पाने मिसळा. त्यात कलोंजी, सुकलेला आवळा, कोरफडीचा गर आणि मेथी दाणे मिक्स करा. सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. घरगुती हेअर मास्क तयार होईल.
हा हेअर मास्क आठवड्यातून दोन वेळा केसांना लावायला हवा. केसांना हे ३ ते ४ तास लावा. नंतर केस शाम्पूने धुवा. हा उपाय ३ महिने सलग केल्यानंतर केस काळे होण्यास मदत होईल. हा हेअर मास्क लावल्याने केस चमकतात, केसांचा रंग देखील काळा होतो. केसात जर कोंडा असेल तर ती समस्या देखील कमी होते.
