Lokmat Sakhi >Beauty > त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...

त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...

How To Use Desi Ghee For Skin & Hair Problems : Benefits of Ghee for Skin & Hair Care : How to use desi ghee for healthy skin and hair : Different Ways To Use Ghee For Skin & Hair : Different Ways to Utilize Ghee for Hair & Skin : चमचाभर तुपाने त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या होतात गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 17:56 IST2025-06-13T17:38:50+5:302025-06-13T17:56:43+5:30

How To Use Desi Ghee For Skin & Hair Problems : Benefits of Ghee for Skin & Hair Care : How to use desi ghee for healthy skin and hair : Different Ways To Use Ghee For Skin & Hair : Different Ways to Utilize Ghee for Hair & Skin : चमचाभर तुपाने त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या होतात गायब...

How To Use Desi Ghee For Skin & Hair Problems Benefits of Ghee for Skin & Hair Care Different Ways To Use Ghee For Skin & Hair | त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...

त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...

आपल्या रोजच्या आहारात चमचाभर साजूक तूप खाणे फायदायचे ठरते. आपल्या आरोग्यासोबतच, साजूक तूप आपली त्वचा आणि केस यांसाठी देखील तितकेच उपयुक्त ठरते. साजूक तुपात असलेली जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ॲसिड्समुळे हे त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आपण (How To Use Desi Ghee For Skin & Hair Problems) पहातोच की, अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये साजूक तुपाचा (Benefits of Ghee for Skin & Hair Care) वापर केला जातो. त्वचा आणि केसांच्या (How to use desi ghee for healthy skin and hair) अनेक समस्या आपल्यापैकी बऱ्याचजणींना सतावतात. असे असले तरी या समस्यांवर अनेक उपाय करूनही काहीवेळा या समस्या कमी होतंच नाहीत, अशावेळी साजूक तुपाचा अस्सल असरदार घरगुती उपायच उपयोगी ठरतो( Different Ways To Use Ghee For Skin & Hair).

त्वचा आणि केसांसाठी साजूक तुपाच्या नियमित वापरामुळे अनेक समस्या दूर होऊन, त्वचा व केसांचे आरोग्य व सौंदर्य जपले जाते. प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर रोहित सचदेवा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन साजूक तूप त्वचा व केसांसाठी कसे वापरावे याबद्दल माहिती दिली आहे. रोहित सचदेवा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये साजूक तूप वापरण्याचे ५ उत्तम पर्याय सांगितले आहेत. या पद्धतींद्वारे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या चुटकीसरशी दूर करु शकता. 

त्वचा आणि केसांसाठी साजूक तुपाचा अस्सल असरदा उपाय... 

१. चमकदार त्वचेसाठी :- जर त्वचेची नैसर्गिक चमक कमी झाली असेल तर यावर उपाय म्हणून साजूक तूप अत्यंत फायदेशीर आहे. साजूक तूप हे त्वचेसाठी  एक अत्यंत उत्तम आणि नैसर्गिक सौंदर्य घटक आहे. तूपामध्ये असलेल्या जीवनसत्त्वे, फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे ते त्वचेला आवश्यक पोषण देते आणि ताजेपणा टिकवण्यास मदत करते. यासाठी, एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन, १ चमचा तूप आणि थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर किमान २० मिनिटे लावा. त्यानंतर, थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हा उपाय करु शकता.

अथिया शेट्टी केसांना लावते 'हे' घरगुती तेल! म्हणून तिचे केस दिसतात सुंदर - पाहा तिचा देसी उपाय...

२. डार्क सर्कल्स :- डोळ्यांखालील डार्क सर्कल्सची समस्या खूपच वाढली असेल तर साजूक तूप फायदेशीर मानले जाते. यासाठी अर्धा चमचा कॉफी पावडरमध्ये चिमूटभर हळद मिसळावी, त्यानंतर त्यात अर्धा चमचा साजूक तूप घालावे. या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि डोळ्यांभोवती लावा. २० मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. डार्क सर्कल्स घालवण्यासाठी तुम्ही हा उपाय दररोज देखील करु शकता.

३. कोरडे ओठ :- हिवाळा असो किंवा उन्हाळा कोरड्या ओठांची समस्या कायम सतावते. ओठ फुटणे, भेगा पडणे, ओठांची सालंपट निघणे अशा अनेक समस्यांवर चमचाभर साजूक तूप देखील पुरेसे आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी बोटांवर थोडे साजूक तूप घेऊन त्याने ओठांना मसाज करावा. साजूक तूप कोरड्या आणि फाटलेल्या ओठांना हायड्रेट करून त्यांना पुन्हा निरोगी व मऊमुलायम करते. 

तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर करेल जादू! तुरटीच्या फेसपॅकपासून टोनरपर्यंत त्वचेसाठी 'असा' करा वापर...

४. नाभीत साजूक तूप घाला :- नाभी हा शरीराचा केंद्रबिंदू मानला जातो. संपूर्ण शरीराच्या अनेक नसा नाभीला जोडतात. यासाठीच आपण साजूक तुपाचे काही थेंब नाभीत टाकून १० ते १५ मिनिटे हलक्या हाताने मालिश करू शकता. नाभीवर साजूक तूप लावण्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. आयुर्वेदानुसार,  नाभीमध्ये तूप लावल्याने पचनशक्ती सुधारते, त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय, तूपाचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला स्वच्छ ठेवतात आणि ताजेतवाने बनवतात. नाभीवर तूप लावल्याने वात दोष संतुलित राहतो, ज्यामुळे मानसिक स्थैर्य वाढते आणि तणाव कमी होतो. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य सुधारते.

५. केसांसाठी :- जर केस फारच कोरडे,रुक्ष, निस्तेज झाले असतील तर अशा केसांसाठी साजूक तूप वापरणे फायद्याचे ठरु शकते. नारळाच्या तेलात थोडे साजूक तूप मिसळून ते शॅम्पू करण्यापूर्वी २० मिनिटे केसांना लावून ठेवावे. नारळाचे तेल आणि साजूक तूप यांचे एकत्रित मिश्रण केसांसाठी फायदेशीर ठरु शकते. नारळाच्या तेलामध्ये असलेले फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन्स केसांना नैसर्गिक ओलावा देऊन त्यांना मऊ बनवतात. तूपामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स केसांच्या मुळांना पोषण देतात आणि त्यांची वाढ होण्यास मदत करतात. या उपायामुळे केसांची गुणवत्ता सुधारते, त्यांची वाढ  होते आणि ते अधिक मऊ आणि चमकदार बनतात.


Web Title: How To Use Desi Ghee For Skin & Hair Problems Benefits of Ghee for Skin & Hair Care Different Ways To Use Ghee For Skin & Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.