Join us

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी दह्याचा असा करा वापर, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:23 IST

Hair Care: केसांमधील हा कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. असाच उपाय म्हणजे दही.

Hair Care: हिवाळ्यात गरम पाण्यानं डोकं धुतल्यानं अनेकांना केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या होते. कोंडा डोक्याच्या त्वचेला चिकटून बसतो. अशात केवळ शाम्पूचा वापर करून कोंडा दूर होत नसतो. केसांमधील हा कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. असाच उपाय म्हणजे दही. चला जाणून घेऊ दह्यानं केसांमधील कोंडा कसा दूर केला जाऊ शकतो.

कोंडा दूर करण्यासाठी दही

डोक्यातून कोंडा दूर करण्यासाठी दह्याचा वापर करता येतो. साधं दही थेट डोक्यावर लावू शकता. हे १५ ते २० मिनिटं डोक्यावर लावून ठेवा आणि त्यानंतर केस पाण्यानं धुवून स्वच्छ करा. साधं दही लावण्यासोबत त्यात थोडा लिंबाचा रसही मिक्स करू शकता. याने केस आणखी चांगले स्वच्छ होतील.

इतरही काही उपाय

- केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात थोडा लिंबाचा रस टाका. हे तेल हलकं गरम करा. नंतर हे तेल डोक्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. याने डोक्याच्या त्वचेमधील खाज आणि सूज कमी होईल.

- बेकिंग सोडा सुद्धा डोक्याच्या त्वचेवर चिकटून बसलेला कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. बेकिंग सोड्यात थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा. काही वेळानं केस धुवून घ्या. कोंडा दूर झालेला दिसेल.

- कोरफडही डोक्यावर लावू शकता. कोंड्यामुळे होणारी खाज कमी करण्यासाठी कोरफडीचा गर फायदेशीर ठरतो. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-फंगल गुण केसांसाठी चांगले असतात. कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिक्स करून केसांवर लावू शकता.

- डोक्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरही वापरू शकता. अॅप्पल सायडर व्हिनेगर केसांवर साधं लावता येणार नाही. यासाठी २ चमचे व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिक्स करा. याने केस धुवा. कोंडा कमी होण्यास या पाण्याची मदत मिळेल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स