Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:14 IST

Curd Hair Mask for Summer : काही सोपे, नॅचरल आणि घरगुती देखील केसांना या दिवसात चांगली सुरक्षा देऊ शकतात. दही हा केसांसाठी वापरला जाणारा रामबाण उपाय आहे.

Curd Hair Mask for Summer : उन्हाळ्यात प्रखर सूर्यकिरणांमुळे आणि उष्णतेमुळे केवळ त्वचेचं नुकसान होतं असं नाही तर केसांचं देखील मोठं नुकसान होतं. केस उन्हामुळे आणि सूर्यकिरणांमुळे ड्राय होतात, तुटतात आणि घामामुळे गळू लागतात. अशात फक्त स्कार्फ बांधून केसांची योग्य ती काळजी घेतली जाऊ शकत नाही. मग केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरायचे का? तर नाही. काही सोपे, नॅचरल आणि घरगुती देखील केसांना या दिवसात चांगली सुरक्षा देऊ शकतात. दही हा केसांसाठी वापरला जाणारा रामबाण उपाय आहे. यातील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटामिन बी ५ आणि लॅक्टिक अॅसिड केसांना भरपूर पोषण देतात. केसांना थंडावा देतात आणि ओलावा कायम ठेवतात.

दही केसांसाठी वरदान कसं?

दही थंड असल्याने टाळुचा उष्णतेपासून बचाव होतो. सनबर्न किंवा खाज येण्यासारखी समस्या देखील कमी होते. इतकंच नाही तर यातील लॅक्टिक अॅसिडने टाळू साफ राहतो आणि कोंडाही दूर होतो. दह्यातील प्रोटीन आणि फॅटी अॅसिडने केसांचे मूळ मजबूत होतात आणि केस तुटण्याचा धोका कमी होतो. दह्याचा केसांना होणारा आणखी एक मोठा फायदा म्हणजे दह्याने केस खोलवर कंडीशन होतात, ज्यामुळे ते मुलायम आणि चमकदार दिसतात. तसेच दह्याने डोक्यातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे केसांची वाढ होण्यासही मदत मिळते.

केसांसाठी दही वापरण्याची योग्य पद्धत 

दही आण  मधाचा हेअर मास्क - २ मोठे चमचे दही घ्या, त्यात १ चमचा मध घाला. हे मिश्रण टाळू आणि केसांवर लावा. ३० मिनिटांनंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने केस धुवा. या मास्कने केस उन्हाळ्यातही मुलायम आणि चमकदार राहतील. 

दही आणि मेथीची पेस्ट - रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे बारीक करून दह्यात मिक्स करा. ही पेस्ट कोंडा आणि टाळूवर होणारं इन्फेक्शन दूर करण्यास खूप मदत करते.

दही आणि कोरफडीचा गर - दही आणि कोरफडीचं मिश्रणही केसांसाठी वरदान आहे. समान प्रमाणात दही आणि कोरफडीचा गर मिक्स करून केसांवर लावा. याने टाळूला थंडावा मिळतो आणि केसांना पोषण मिळतं.

काय काळजी घ्याल? 

केसांना किंवा टाळूवर जर दही जास्त वेळ लावून ठेवाल किंवा पुन्हा पुन्हा लावाल तर सर्दी होऊ शकते. जर केसांना लावलेलं दही योग्यपणे साफ केलं नाही तर वास येण्याचीही समस्या होते. ज्यांचे केस तेलकट असतात त्यांनी केसांना दही आठवड्यातून एकदाच लावावं. नाही तर केसांचा चिकटपणा वाटू शकतो.

उन्हाळ्यात दही केसांसाठी नॅचरल, प्रभावी आणि स्वस्त उपाय ठरतो. जर योग्य पद्धत वापरली केला गेला आणि गरजेनुसार काळजी घेतली गेली तर केसांवर चांगला प्रभाव दिसून येऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Curd for hair: Get soft, shiny hair this summer!

Web Summary : Fight summer hair woes with curd! Its nutrients nourish, cool the scalp, and reduce hair fall. Mix with honey, fenugreek, or aloe vera for best results. Use cautiously to avoid cold.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्ससमर स्पेशल