Join us

चमचाभर कॉफी 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा! टॅनिंग- ब्लॅकहेड्स जाऊन त्वचेवर येईल ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 15:32 IST

Skin Care Tips Using Coffee Powder: त्वचा खूप काळवंडली असेल किंवा डल, निस्तेज झाली असेल तर बाकी सगळे उपाय सोडा (how to use coffee powder for glowing skin?) आणि कॉफीचा हा एक सोपा उपाय करून पाहा..(best home remedies using coffee powder for radiant glow )

ठळक मुद्देचमचाभर कॉफी घेऊन हे काही सोपे आणि स्वस्तात मस्त उपाय करून पाहा, बघा काही मिनिटांतच कशी चमकेल तुमची त्वचा..

रोजच्या धावपळीमध्ये आपण एवढे जास्त अडकून जातो की चेहऱ्याची, त्वचेची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. मग कधीतरी असाच एखादा दिवस आपण आरशासमोर थोडा वेळ काढून उभे राहातो आणि तेव्हा लक्षात येतं की चेहरा खूपच काळवंडला आहे. त्वचा खूपच डल आणि निस्तेज दिसत आहे. टॅनिंग आणि डेडस्किनचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं आहे.. पण असं सगळं होऊनही त्वचेला छान पॅम्परिंग करायला आपल्याकडे वेळच नसतो. सौंदर्य खुलविण्यासाठी तासनतास पार्लरमध्ये जाऊन बसणं तर केवळ अशक्य असतं (best home remedies using coffee powder for radiant glow).. म्हणूनच आता ते महागडे आणि वेळखाऊ उपाय सोडा आणि चमचाभर कॉफी घेऊन हे काही सोपे आणि स्वस्तात मस्त उपाय करून पाहा (how to make coffee face pack at home?).. बघा काही मिनिटांतच कशी चमकेल तुमची त्वचा..(how to use coffee powder for glowing skin?) 

 

त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॉफी फेसपॅक

१. चेहऱ्यावरची डेडस्किन खूप वाढली असेल तर हा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर घ्या.

Valentine's Day: प्रेमाच्या दिवशी गुलाबाला एवढं महत्त्व का असतं बरं? वाचा गुलाबाचे रंजक फायदे

त्यामध्ये १ चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा मध घालून त्याची पेस्ट तयार करा. आता चेहरा थोडा ओलसर करून ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि ५ ते ६ मिनिटांसाठी गोलाकार मसाज करा. यानंतर १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा छान मऊ- मुलायम होईल.

 

२. टॅनिंग होऊन त्वचा खूप काळवंडली असेल तर त्यासाठी एका वाटीमध्ये १ ते दिड चमचा कॉफी पावडर घ्या.

तुमच्या घरात जेड प्लांट असायलाच हवं, कारण....; वाचा जेड प्लांट घरात असण्याचे ६ फायदे

त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल घाला आणि सगळं व्यवस्थित हलवून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. टॅनिंग जाऊन त्वचेवर छान ग्लो येईल.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी