Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > तांदळाचेच नाही तर नारळाचे पाणीही देतं जबरदस्त ग्लो! महागड्या पार्लरलला करा बाय- घरगुती ब्यूटी सिक्रेट

तांदळाचेच नाही तर नारळाचे पाणीही देतं जबरदस्त ग्लो! महागड्या पार्लरलला करा बाय- घरगुती ब्यूटी सिक्रेट

Coconut water for skin: Rice water skin benefits: Home beauty secrets: चेहऱ्यासाठी नेमकं काय फायदेशीर तांदळाचे पाणी की नारळाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2025 15:02 IST2025-11-28T15:01:09+5:302025-11-28T15:02:10+5:30

Coconut water for skin: Rice water skin benefits: Home beauty secrets: चेहऱ्यासाठी नेमकं काय फायदेशीर तांदळाचे पाणी की नारळाचे?

How to use coconut water for glowing skin at Home Benefits of rice water and coconut water for face glow Best natural beauty remedy for instant skin glow | तांदळाचेच नाही तर नारळाचे पाणीही देतं जबरदस्त ग्लो! महागड्या पार्लरलला करा बाय- घरगुती ब्यूटी सिक्रेट

तांदळाचेच नाही तर नारळाचे पाणीही देतं जबरदस्त ग्लो! महागड्या पार्लरलला करा बाय- घरगुती ब्यूटी सिक्रेट

लग्नसमारंभ सुरु झाला की आपल्यापैकी अनेकांना त्वचेवर ग्लो हवा असतो. त्यासाठी महागडे पार्लर किंवा अनेक ब्यूटी ट्रिटमेंट्स केल्या जातात.(Beauty Tips) फेशियल, क्लिनअप, केमिकल पील्स अशा अनेक पद्धतींमुळे काही काळासाठी त्वचेला चमक मिळते. पण त्वचेचे नैसर्गिक तेज मात्र हरवते. त्वचा संवदेनशील असेल तर ब्यूटी प्रॉडक्ट्स आपल्याला त्वचेवर परिणाम करतात.(Coconut water for skin) आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यासह त्वचेवर देखील त्याचा परिणाम होतो. पण काही घरगुती सोपे उपाय केल्यास आपल्याला त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळेल. (Rice water skin benefits)
तांदळाचं पाणी (Rice Water) हे स्किनला ग्लो देतं हे तर बऱ्याच जणींना माहिती आहेच. पण अनेकांना माहित नसतं की नारळाचं पाणी हे तांदळाच्या पाण्याइतकंच नाही, तर त्यापेक्षा अधिक फ्रेश, हायड्रेटेड आणि ग्लास स्किन ग्लो देणारं घटक आहे.(Home beauty secrets) पण नेमकं त्वचेवर काय लावावं हे अनेकांना समजत नाही. पाहूया याविषयी सविस्तर 

हिवाळ्यात रात्री त्वचेला लावा ६ गोष्टी, सकाळी चेहऱ्यावर येईल तेज, कोरडी-निस्तेज त्वचा दिसेल सुंदर

1. तांदळाचे पाणी 

तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राखण्यास मदत करतात. तांदळाच्या पाण्यात दाहक- विरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करतात. तांदळाचे पाणी त्वचेला हायड्रेट आणि मऊ करते. त्यासाठी तांदळाचे पाणी केवळ चमकदार त्वचेसाठी फायदेशीर नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 


2. नारळाचे पाणी

नारळ पाणी हे आपल्याला संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेला वृद्धत्वाच्या लक्षणांपासून वाचवण्याचे काम करतात. नारळ पाणी त्वचेला हायड्रेट करते आणि ग्लो करते. नारळ पाणी प्यायल्याने अनेक आजार देखील बरे होतात. नारळाच्या पाण्यातील व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि नैसर्गिक हायड्रेशन क्षमता त्वचेवर जादूसारखी काम करते. दिवसभर धूळ, प्रदूषण आणि मेकअपमुळे चेहऱ्यावर जडपणा येतो, त्वचा कोरडी होते, ग्लो कमी होतो. पण झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून फक्त कॉटनने नारळाचे पाणी लावलं, तरी सकाळी त्वचा फ्रेश, टाईट, ब्राइट आणि नॅचरल ग्लोइंग दिसते. 

3. त्वचेसाठी तांदळाचे की नारळाचे पाणी चांगले? 

तांदळाचे पाणी आणि नारळाचे पाणी दोन्ही फायदेशीर आहे. पण या दोघांपैकी तांदळाचे पाणी अधिक फायदेशीर ठरु शकते. तांदळाचे पाणी त्वचेला अधिक हायड्रेटिंग आणि मऊ करते. परंतु नारळाचे पाणी त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ते प्यायल्याने त्वचेला आतून पोषण मिळते. यासाठी नारळाचे पाणी प्या आणि तांदळाचे पाणी त्वचेला लावा. 
 

Web Title : चावल और नारियल पानी: चमकदार त्वचा के लिए प्राकृतिक सौंदर्य रहस्य

Web Summary : महंगे पार्लरों को छोड़ें! चावल और नारियल पानी प्राकृतिक चमक प्रदान करते हैं। चावल का पानी हाइड्रेट करता है, जबकि नारियल पानी एंटी-एजिंग लाभ और एक ताज़ा रंग देता है। सर्वोत्तम परिणामों के लिए चावल का पानी लगाएं और नारियल पानी पिएं।

Web Title : Rice and Coconut Water: Natural Beauty Secrets for Glowing Skin

Web Summary : Skip expensive parlors! Rice and coconut water offer natural skin glow. Rice water hydrates and softens, while coconut water provides anti-aging benefits and a fresh, bright complexion. Use rice water topically and drink coconut water for best results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.