Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या आय-क्रीम विसरा! चमचाभर खोबऱ्याच्या तेलाने डार्क सर्कल्स होतील कमी - ७ दिवसात चेहराही टवटवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2026 09:30 IST

Coconut oil for dark circles: Natural remedy for dark circles: Eye care home remedies : डोळ्यांखाली खोबऱ्याचे तेल लावल्याने खरंच फरक दिसतो का?

सध्याच्या डिजिटल युगात आपला अर्ध्याहून वेळ लॅपटॉप, मोबाईलच्या स्क्रीनसमोर जातो. कामाचा ताण, अपुरी झोप आणि वाढते प्रदूषण यामुळे आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे म्हणजे डार्क सर्कल्स येणं ही सध्या सामान्य समस्या बनली आहे.(Coconut oil for dark circles) या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो. ही वर्तुळे लपवण्यासाठी आपण महागडे कन्सिलर किंवा केमिकल असलेल्या आय-क्रीम्सचा आधार घेतो. पण याचा फारसा काही फरक दिसत नाही.(Natural remedy for dark circles) चेहरा कितीही सुंदर असला तरी डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे आपलं संपूर्ण सौंदर्य खराब करतात. पण आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत.(Eye care home remedies ) ज्या डार्क सर्कल्सवर अत्यंत प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया, डोळ्यांखाली खोबऱ्याचे तेल लावल्याने खरंच फरक दिसतो का, याविषयी. 

चेहऱ्यावरील टॅनिंग, काळे डाग होतील गायब, बटाट्याची सालं 'अशी' चोळा त्वचेवर- १० मिनिटांत चेहऱ्यावर येईल चमक

1. खोबऱ्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अँटी-ऑक्सिडंट्स आणि लॉरिक ॲसिड असते. आपल्या डोळ्यांखालील त्वचा अत्यंत नाजूक आणि पातळ असते. तिथे ओलावा कमी झाला की काळेपणा वाढतो. खोबऱ्याचे तेल हे त्वचेला खोलवर हायड्रेट करते. ज्यामुळे पेशींची दुरुस्ती होते आणि नैसर्गिकरित्या त्वचा उजळण्यास मदत होते. 

2. खोबऱ्याचे तेल आणि हळदीचा उपाय डार्क सर्कल्ससाठी चांगला आहे. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. अर्धा चमचा खोबऱ्याच्या तेलात चिमूटभर हळद मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांखाली १५ मिनिटे लावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारुन डोळ्यांखालील काळेपणा कमी होईल. 

3. खोबऱ्याचे तेल आणि बदामाचे तेल एकत्र करा. रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाने डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मसाज करा. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन के आणि खोबऱ्याच्या तेलाच ओलावा असतो जो आपल्या त्वचेला पुनरुज्जीवित करण्याचे काम करतो. 

4. आपण शुद्ध खोबरेल तेलाचे दोन थेंब बोटावर घेऊन डोळ्यांखाली गोलाकार पद्धतीने फिरवा. यामुळे थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यांखालील सुरकुत्याही कमी होतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Coconut oil reduces dark circles, rejuvenates skin in 7 days!

Web Summary : Combat dark circles with coconut oil! Hydrate skin, reduce pigmentation using coconut oil with turmeric or almond oil. Simple, natural remedy.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी