Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > आंघोळीसाठी महागड्या साबण- बॉडीवॉशला करा बाय! 'असे' लावा त्वचेवर नारळाचे तेल- टॅनिंग होईल कमी, लोशन्सपेक्षा भारी उपाय..

आंघोळीसाठी महागड्या साबण- बॉडीवॉशला करा बाय! 'असे' लावा त्वचेवर नारळाचे तेल- टॅनिंग होईल कमी, लोशन्सपेक्षा भारी उपाय..

Coconut oil benefits for skin: Reduce tanning naturally: Winter skincare tips: काही घरगुती उपाय केल्यास टॅनिंग कमी होऊन त्वचा मऊ होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2025 15:57 IST2025-11-24T15:56:57+5:302025-11-24T15:57:55+5:30

Coconut oil benefits for skin: Reduce tanning naturally: Winter skincare tips: काही घरगुती उपाय केल्यास टॅनिंग कमी होऊन त्वचा मऊ होईल.

How to use coconut oil on skin to reduce tanning Natural winter skincare routine without expensive products Benefits of applying coconut oil before bath | आंघोळीसाठी महागड्या साबण- बॉडीवॉशला करा बाय! 'असे' लावा त्वचेवर नारळाचे तेल- टॅनिंग होईल कमी, लोशन्सपेक्षा भारी उपाय..

आंघोळीसाठी महागड्या साबण- बॉडीवॉशला करा बाय! 'असे' लावा त्वचेवर नारळाचे तेल- टॅनिंग होईल कमी, लोशन्सपेक्षा भारी उपाय..

हिवाळा सुरु झाला की त्वचेचा कोरडेपणा वाढतो. इतकंच नाही तर आपल्या रॅशेस येतात, खाज सुटते. वातावरणातल्या गारव्यामुळे त्वचेवर परिणाम होतो.(winter skin care) महागडे बॉडीवॉश, सुगंधी साबण किंवा मॉइश्चरायझिंग लोशन्स वापरूनही त्वचा पुन्हा कोरडी, रखरखीत होते.(Coconut oil benefits for skin)  त्यामुळे रोज काय लावावं, कोणता प्रॉडक्ट चांगला, कोणता टाळावा. या सगळ्याचा विचार करत महिलांची अधिकच गोंधळ उडतो.(Coconut oil skincare routine)
आपल्या त्वचेवरील टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळी उत्पादने वापरतो. पण काहीही लावले तरी चेहरा निस्तेज दिसतो.(Coconut oil benefits for skin) पण काही घरगुती उपाय केल्यास टॅनिंग कमी होऊन त्वचा मऊ होईल. 

लग्नाच्या गडबडीत चेहऱ्यावर थकवा दिसतो? ‘हे’ तेल लावा, चेहऱ्यावर येईल चमक-नवरी दिसेल तेजस्वी

त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी आपल्याला बेसन, लिंबू, दूध आणि तेल लागेल. शरीरावरचे टॅनिंग कमी करण्यासाठी आपल्याला १ चमचा बेसन, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक चमचा नारळाचे तेल आणि दोन चमचे दूध घाला. सगळं व्यवस्थित मिसळा. याची पेस्ट तयार झाल्यानंतर त्वचेवर चोळा. १० मिनिटे चोळल्यानंतर नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. 

हा उपाय करण्यापूर्वी आपण शरीराच्या कोणत्याही भागावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. इनो त्वचेवर थेट लावले तर हानिकारक आहे. बेसनाचा वापर आपल्या त्वचेवर नैसर्गिकरित्या केल्याने ती स्वच्छ होते. हे आपल्या त्वचेवरील तेल शोषून घेते. त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. मृत त्वचेतील पेशी काढून त्वचा चमकवते. 

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे त्वचेला उजळवते. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते. तसेच नैसर्गिक आम्ल कमी करुन त्वचेला एक्सफोलिएट करते. ज्यामुळे त्वचा चमकायला लागते. दुधात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे ती मऊ आणि गुळगुळीत होते. ते नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि कोरडेपणा कमी करते.


Web Title : नारियल तेल: टैनिंग कम करे, लोशन से बेहतर!

Web Summary : सर्दियों में नारियल तेल त्वचा को रूखेपन से बचाता है, टैनिंग कम करता है और त्वचा को मुलायम बनाता है। बेसन, नींबू, दूध और नारियल तेल मिलाकर हफ्ते में दो बार लगाएं।

Web Title : Coconut oil for skin: Reduce tanning, better than lotions!

Web Summary : Combat winter dryness with coconut oil! This home remedy reduces tanning and softens skin. Mix coconut oil with gram flour, lemon, and milk. Apply twice a week for best results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.