ऋतू कोणताही असला तरी आपल्या चेहऱ्यावर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो. हिवाळ्यात त्वचेवरील ओलावा खोलवर शोषून घेतला जातो.(Coconut oil for skin) ज्यामुळे कितीही लोशन किंवा मॉइश्चरायझर लावले तरी चेहऱ्या कोरडा पडतो. या काळात आपली त्वचा सतत निस्तेज होते. अशावेळी आपण त्वचेवर महागडे सीरम, क्रीम्स, कोलेजन फॉर्म्युले आणि नवीन ब्रँडेड उत्पादनांचा वापर करतो.(Natural skin care) पण यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो.(Glowing skin home remedy) त्वचा डल दिसू लागते, पिंपल्स- मुरुमाची समस्या वाढते. डार्क सर्कल कमी होण्याऐवजी ते जास्त दिसू लागतात.(Face glow tips) अशावेळी आपण काही घरगुती सोपा नारळाच्या तेलाचा उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. यासाठी आपल्याला काय करायला हवं, जाणून घेऊया.
आपल्याला सगळ्यात आधी एका भांड्यात बेसनाचे पीठ घ्यावे लागेल. यात गरजेनुसार नारळाचे तेल आणि गुलाबजल घाला. हे सर्व घटक मिसळून आपल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने त्वचा धुवा. ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो होण्यास मदत होईल.
तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण साखर, गोडाचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे टाळायला हवे. यामुळे त्वचेतील इन्सुलिन वाढते ज्यामुळे चेहरा तेलकट होतो. तसेच मुरुमे, पुरळ आणि त्वचेवर जळजळ होऊ लागते. साखर कोलेजनला नुकसान करते. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. ज्यामुळे सुरकुत्या आणि त्वचेवर बारीक रेषा दिसू लागतात.
प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम फ्लेवर्स आणि ट्रान्स फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचा कोरडी, लालसर किंवा अतिसंवेदनशील होते. ज्यामुळे मुरुमे आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका देखील वाढतो. तेलकट आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचेवरील सेबमचे उत्पादन खूप लवकर वाढते. ज्यामुळे ओपन पोअर्स, मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स वाढतात. या छोट्या चुकांमुळे त्वचा चिकट होते, यामुळे त्वचेवरील ग्लो देखील हरवतो. त्यासाठी त्वचेची प्रत्येक ऋतूत विशेष काळजी घ्यायला हवी.
