त्वचेची योग्य ती नीटनेटकी काळजी घेणं इज मस्ट! त्वचेचे आरोग्य व सौंदर्य जपून ठेवायचे असल्यास वेळीच त्वचेकडे लक्ष देणे गरजेचे असते. साध्य त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा (How To Use Coconut Milk For Healthy & Glowing Skin) वापर करण्यावर अनेकजणी भर देतात. त्वचेसाठी (Amazing Coconut Milk Benefits for Skin) घरगुती उपाय केल्याने काही अपाय होण्याचा धोका नसतो तसेच परिणामही नैसर्गिक व कायम टिकणारे असल्याने नैसर्गिक उपाय केव्हाही उत्तमच. त्वचेसाठीच्या नैसर्गिक उपायांमध्ये 'नारळाचे दूध' हे अतिशय फायदेशीर मानले जाते(How to Apply Coconut Milk on Face for Glowing Skin).
नारळाच्या दुधामध्ये अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जी त्वचेला पोषण देऊन तिचा ओलावा टिकवण्यास मदत करते. नारळाचे दूध हे त्वचेसाठी सौम्य आणि थंडावा देणारे असल्याने त्वचेच्या अनेक समस्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्वचेला नैसर्गिक पोषण देणारे, कोरडी, रापलेली त्वचा मऊमुलायम करणारे आणि त्वचेतील सूज व जळजळ कमी करणारे हे नारळाचे दूध आता अनेक घरगुती स्किन केअर उपायांमध्ये वापरले जाते. आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये नारळाच्या दुधाचा समावेश कोणकोणत्या प्रकारे करु शकतो ते पाहूयात.
स्किनकेअरसाठी नारळाच्या दुधाचा असा करा वापर...
१. मॉइश्चरायझरप्रमाणे वापरा :- नारळाचे दूध हे एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. हे त्वचेच्या आतपर्यंत जाऊन ती मऊमुलायम आणि हायड्रेट ठेवते, तसेच कोरडेपणापासून त्वचेचे संरक्षण केले जाते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे नारळाचे दूध घ्या आणि ते चेहरा व मान यावर हळूहळू मसाज करत लावा. हे दूध रात्रीभर तसेच ठेवावे आणि सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवावा. काहीच दिवसांत त्वचा अधिक मऊमुलायम व हायड्रेटेड वाटू लागेल.
२. क्लिंझर किंवा मेकअप रिमूव्हरप्रमाणे वापरा :- नारळाचे दूध त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि मेकअप काढण्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे. नारळाच्या दुधाच्या मदतीने कोणत्याही हानिकारक केमिकल्सशिवाय त्वचेवरची धूळ, घाण आणि मेकअप सहजपणे काढून टाकता येतो. यासाठी एक कॉटन बॉल घ्या, त्यावर थोडेसे नारळाचे दूध घ्या आणि त्याने चेहरा अलगद पुसा. नारळाचे दूध मेकअप व त्वचेवरील धूळ, घाण देखील सहज काढून टाकते आणि त्वचेला मऊ व हायड्रेटेड ठेवते.
भुवया आणि पापण्यांचे केस पांढरे व्हायला लागले? बोटावर ‘हे’ तेल घेऊन करा मसाज- पाहा जादू...
पोटली तेलाने करा मसाज! आजीबाईच्या बटव्यातील सोन्यासारखा उपाय, केसांच्या समस्याच विसरुन जा...
३. नारळाच्या दुधाचा फेसमास्क :- २ टेबलस्पून नारळाचे दूध, १ टेबलस्पून मध आणि चिमूटभर हळद एकत्रित मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक त्वचेला नैसर्गिक चमक देतो आणि ताजेतवाने देखील करतो. याचबरोबर, २ टेबलस्पून नारळाचे दूध आणि १ टेबलस्पून ओटमील पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुम असलेल्या भागावर लावा आणि १५ मिनिटांनंतर धुवा. हा उपाय मुरुमांची सूज कमी करण्यात मदत करतो आणि त्वचा शांत करतो.
४. टॅनिंग दूर करण्यासाठी :- सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे टॅनिंग होते. अशावेळी नारळाचे दूध टॅनिंग कमी करण्यात आणि त्वचेचा रंग उजळ करण्यास उपयुक्त ठरते. यासाठी समान प्रमाणात नारळाचे दूध आणि मुलतानी माती एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि पूर्णपणे सुकल्यावर धुवा. हा उपाय नियमित केल्यास टॅनिंग हळूहळू कमी होत जाते आणि त्वचा उजळ दिसू लागते.
५. जळजळ कमी करण्यासाठी :- नारळाच्या दुधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेची सूज, लालसरपणा आणि जळजळ शांत करण्यास मदत करतात. जर त्वचेवर कुठे जळजळ, खाज येत असेल, तर थंड नारळाच्या दुधामध्ये कॉटन पॅड भिजवा आणि त्वचेवर त्या ठिकाणी हलकेच लावून ठेवा. यामुळे त्वरित आराम मिळतो आणि त्वचा शांत होते.