सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अगदी कमी वयातच चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, सुरकुत्या किंवा टॅनिंग पाहायला मिळते.(Home remedies for tanning) प्रदूषण, उन्हाचा तडाखा, वाढणारा स्क्रीन टाइम, अपुरी झोप या सगळ्याचा आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसतो. चेहऱ्यावरची टॅनिंग जात नाही, डार्क सर्कल वाढतात, त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसते. पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स प्रत्येकाच्या चेहऱ्याला सूट होतील असं नाही. (Dark circles removal naturally)हिवाळा सुरु झाला की अनेकांचा चेहरा काळा पडतो, उन्हामुळे टॅनिंग वाढते. यावर कितीही उपाय केले तरी चेहरा काही पुन्हा हवा तसा होत नाही.(Skincare tips for glowing skin) पण काही घरगुती फेस पॅक त्वचेला लावल्यास आपल्याला फायदा होईल. २० मिनिटांत टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया फेस पॅक कसा बनवायचा याविषयी.
माझा आवाज पडेल का तुमच्या कानी? तुमच्या विकासाच्या धुंदीत, माझं मरण..
फेस मास्क बनवण्यासाठी २ चमचे बेसन, १ चमचा मुलतानी माती, कॉफी, लिंबाचा रस आणि २ चमचे दही लागेल. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शोभना सांगतात हा फेस मास्क बनवणे खूप सोपा आहे. वरील सर्व साहित्य मिक्स करुन पॅक तयार करा. हा फेस मास्क आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हलक्या हातांनी मसाज करा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्यास टॅनिंग कमी होईल.
लग्नसोहळ्यात शोभून दिसणारे ६ दागिने, काठाची असो की नऊवारी, घाला सुंदर मराठी साज
बेसन हा आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते. तसेच बेसन कोणत्याही त्वचेवर सूट होते. सतत बाहेर फिरणाऱ्यांसाठी बेसनापासून तयार केलेला फेस मास्क टॅनिंग कमी करण्यास मदत करतात. डोळ्याखालील डार्क सर्कलसाठी बेसनात लिंबू किंवा गुलाबपाणी मिसळून केलेला पॅक त्वचा उजळवण्यास मदत करतो.
हा फेस पॅक तयार करण्यासाठी कोणताही मोठा खर्च करावा लागत नाही. घरात उपलब्ध असलेल्या साध्या घटकांनी बनणारा हा फेसपॅक रोज नाही, तरी आठवड्यातून तीनदा वापरला तरी त्वचेतील बदल सहज दिसू शकतात.
Web Summary : A gram flour face pack can combat tanning, dark circles, and dull skin. This easy homemade remedy combines gram flour, Multani mitti, coffee, lemon juice, and yogurt. Regular use, three times a week, promises visible improvements for brighter, healthier skin.
Web Summary : बेसन का फेस पैक टैनिंग, डार्क सर्कल और बेजान त्वचा से लड़ सकता है। यह आसान घरेलू उपाय बेसन, मुल्तानी मिट्टी, कॉफी, नींबू का रस और दही को मिलाता है। नियमित उपयोग, सप्ताह में तीन बार, उज्जवल और स्वस्थ त्वचा के लिए दृश्यमान सुधार का वादा करता है।