Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे चेहरा काळवंडला- ब्लॅक स्पॉट्स? इवलासा बिटाचा तुकडा करतो जादू- १० मिनिटांत मिळेल त्वचेला सोन्यासारखी चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 13:57 IST

beetroot for skin: remove sun tan naturally: beetroot face pack: अवघ्या १० मिनिटांत त्वचेला दुधासारखी चमक आणि गुलाबी ग्लो मिळवून देण्यासाठी बिटाचा वापर कसा करावा पाहूया.

उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. सनबर्न, टॅनिंग आणि चेहऱ्यावरील काळे डाग (Black Spots) यामुळे नैसर्गिक चमक कुठेतरी हरवून जाते. महागड्या फेशियल आणि केमिकल क्रीम्स वापरूनही अनेकदा हवा तसा रिझल्ट मिळत नाही. वाढते प्रदूषण आणि धूळ यांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो.उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळवंडते ज्यामुळे त्वचा टॅनिंग होते. धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि निस्तेजपणा येतो. महागड्या क्रीम्स आणि पार्लर ट्रीटमेंट्स घेऊनही अनेकदा तात्पुरताच फरक पडतो. अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरात असलेला एक इवलासा बीटाचा तुकडा आपल्या त्वचेसाठी जादूई ठरू शकतो. अवघ्या १० मिनिटांत त्वचेला दुधासारखी चमक आणि गुलाबी ग्लो मिळवून देण्यासाठी बिटाचा वापर कसा करावा पाहूया. 

केस गळती रोखण्यासाठी घरीच करा मॅजिकल हेअर टॉनिक; सोपी पद्धत- महिन्याभरात केस वाढतील गुडघ्यापर्यंत

बिटाचा रस काढा आणि त्यात १ चमचा मध मिसळा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. २० मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा धुवा. मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. आणि बीट त्याच्या अँटीऑक्सि़डंट्सद्वारे नैसर्गिक चमक देते. 

बिटाचा रस काढा आणि त्यात १ चमचा लिंबाचा रस मिसळा. हे आपल्या चेहरा आणि मानेला लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा. लिंबू टॅन आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते. तर बीट त्वचेला पोषण देते. 

बिटाचा लहान तुकडा किसून त्याचा रस काढा. त्यात २ चमचे दह्याचे मिश्रण करा आणि त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचा आणि मानेवर लावा. २० मिनिटानंतर कोमट पाण्याने त्वचा धुवा. हा पॅक टॅनिंग कमी करत नाही तर त्वचेला मऊ करण्यास मदत करतो. यामुळे जळजळही कमी होईल. 

बिटाच्या रसात अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करा. चेहरा आणि मानेला लावा. १५ ते २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. तर बीट त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतो. 

बिटामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे घटक त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण कमी करण्यास आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात. बीटाचा वापर केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी रंग येते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Beetroot for Glowing Skin: Simple Home Remedies for Summer

Web Summary : Combat summer skin issues with beetroot! These easy home remedies lighten tan, reduce dark spots, and restore natural radiance in minutes. Beetroot's antioxidants and vitamins promote healthy, glowing skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी