आजकाल आपल्यापैकी बऱ्याचजणांना केसांच्या अनेक समस्या खूपच त्रास देतात. केसांच्या समस्यांपैकी केस गळतीची समस्या फारच कॉमन आहे. कित्येकदा केस इतक्या मोठ्या प्रमाणांत गळतात की, हळूहळू रोज केस गळून एक दिवस टक्कल पडेल की काय अशीच भीती वाटते. बदलती लाईफस्टाईल, स्ट्रेस, प्रदूषण आणि चुकीच्या हेअर केअरमुळे केस कमकुवत होऊन मोठ्या प्रमाणात गळू लागतात. इतकंच नाही, तर केस पातळ होणं आणि नवीन केस न उगवणं यामुळे अनेकजणी चिंतेत असतात. अशावेळी काही घरगुती नैसर्गिक उपाय घरच्याघरीच करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. आपण अनेकदा केळं खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतो, पण हीच केळ्याची साल केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात, जे केसांना पोषण देण्यास, स्काल्प निरोगी ठेवण्यास आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करू शकतात(how to use banana peel for hair growth).
केळीची सालं केसांसाठी वरदान ठरते, हे ऐकायला (natural banana peel remedy for long and thick hair) थोडं वेगळं वाटेल, पण हे अगदी खरं आहे! वर्षानुवर्षे महागड्या हेअर स्पावर पैसे खर्च करतो, पण आपल्या स्वयंपाकघरातील केळीची सालं ही साधी गोष्ट केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. केसगळती कमी करून नवीन केसांची वाढ नैसर्गिक पद्धतीने करायची असल्यास केळ्याच्या सालीपासून तयार होणारा हा खास हेअर मास्क नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. केळ्याच्या सालीचा हेअर मास्क कसा बनवायचा (homemade banana peel hair mask for hair growth) आणि लावण्याची योग्य पद्धत काय ते पाहूयात.
केसांसाठी केळीच्या सालीचा हेअर मास्क म्हणजे वरदान...
सर्वात आधी ताज्या केळ्याच्या साली घ्या आणि त्यांचे छोटे तुकडे करून घ्या. आता हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून त्याची एक स्मूद पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये तुम्ही थोडे खोबरेल तेल किंवा दही देखील मिक्स करू शकता, जेणेकरून मास्क लावणे सोपे होईल. हे मिश्रण तयार झाल्यावर ते गाळून घेतले पाहिजे, जेणेकरून सालीचे बारीक धागे केसांमध्ये अडकणार नाहीत. ही पेस्ट तुमच्या केसांसाठी एका 'नॅचरल कंडिशनवर' प्रमाणे काम करते.
चिनी महिला चाळिशी ओलांडली तरी दिसतात विशीतल्या तरुणी! पाहा त्या काय करतात रोज...
केसांना हेअर मास्क लावण्याची योग्य पद्धत...
केळीच्या सालींचा तयार हेअर मास्क स्काल्पपासून केसांच्या पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत लावा. पोषक तत्वे केसांच्या मुळांपर्यंत जाण्यासाठी हलक्या हातांनी स्काल्पची मालिश करा. हा मास्क केसांवर साधारण २० ते ३० मिनिटांपर्यंत तसाच राहू द्या. त्यानंतर केस धुण्यासाठी एखाद्या माईल्ड शॅम्पूचा (Mild Shampoo) आणि साध्या पाण्याचा वापर करा. केस धुताना पाणी जास्त गरम नसावे, कारण उष्णतेमुळे केसांचे नुकसान होऊ शकते. चांगल्या परिणामांसाठी आपण हा घरगुती उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा नक्की ट्राय करू शकता.
केळीच्या सालांचा हा हेअर मास्क केसांसाठी कसा फायदेशीर...
१. केळीच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक तेल केसांच्या मुळांना पोषण देतात. त्यामुळे केस मजबूत होऊन तुटणं आणि गळणं कमी होण्यास मदत मिळू शकते.
२. या सालीतील पोषक घटक स्काल्प हेल्दी ठेवतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे नवीन केसांच्या वाढीस चालना मिळू शकते.
३. केळीच्या सालीचा हेअर मास्क नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतो. त्यामुळे ड्राय, रफ आणि फ्रिझी केस अधिक मऊ, सिल्की आणि शायनी दिसू लागतात.
४. केळीच्या सालीतील मॉइश्चरायझिंग गुणधर्म स्काल्पला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
५. या मास्कमधील पोषक तत्त्वांमुळे हेअर फोलिकल्सना मजबुती मिळते, ज्यामुळे फक्त केस गळणे थांबत नाही तर नवीन केस उगवण्यासही मदत होऊ शकते.
Web Summary : Battling hair fall? Banana peel can help! Rich in nutrients, it strengthens hair, promotes growth, and moisturizes the scalp. Make a simple hair mask using blended peel paste, apply for 20-30 minutes, and rinse for best results.
Web Summary : बालों के झड़ने से परेशान हैं? केले का छिलका मदद कर सकता है! पोषक तत्वों से भरपूर, यह बालों को मजबूत करता है, विकास को बढ़ावा देता है और खोपड़ी को मॉइस्चराइज़ करता है। मिश्रित छिलके के पेस्ट का उपयोग करके एक सरल हेयर मास्क बनाएं, 20-30 मिनट के लिए लगाएं, और सर्वोत्तम परिणामों के लिए धो लें।