Join us
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल डाय न वापरता पांढरे केस काळे करण्याचा नॅचरल उपाय, केस गळतीही थांबेल आणि वाढही होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:24 IST

Natural Hair Dye : केस पांढरे होण्याची अडचण फक्त वयस्क लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी तसेच 25–35 वयोगटातील महिला आणि पुरुषही यामुळे त्रस्त आहेत.

Natural Hair Dye : आज केसांबाबत प्रत्येकालाच एक मोठी समस्या भेडसावत आहे आणि ती म्हणजे केस पांढरे होणे. चिंतेची बाब म्हणजे कमी वयातच अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. म्हणजे कमी वयातच आपण म्हातारे झाल्याचं जाणवायला लागतं. ही अडचण फक्त वयस्क लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी तसेच 25–35 वयोगटातील महिला आणि पुरुषही यामुळे त्रस्त आहेत. ज्या वयात केस काळे, दाट आणि मजबूत असायला हवेत, त्या वयातच केस गळू लागतात आणि पांढरे होत आहेत.

अशा वेळी कुणालाही केमिकलयुक्त हेअर डाय वापरायची इच्छा नसते. मात्र नाइलाजाने केसांना रंग लावावा लागतो. या केमिकल डायमध्ये अमोनिया, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि PPD असते, जे केस कोरडे व कमजोर बनवते आणि हेअर फॉल वाढवते. आधीच केस गळतीचा त्रास असताना उरलेले केसही डायमुळे खराब होतात,. म्हणूनच आज आम्ही आपल्याला पांढरे केस काळे करण्याचा एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे अनेक महिने डाय करण्याची गरज भासणार नाही.

आवळा पावडरमुळे केस होतील काळे

आज आपण जो उपाय पाहणार आहोत, त्यामध्ये आवळा पावडर वापरली जाते. आवळा हा व्हिटामिन C चा उत्तम स्रोत आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय त्यामध्ये व्हिटामिन A, E, B कॉम्प्लेक्स, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व घटक मिळून केसांचे आरोग्य सुधारतात आणि केस नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यास मदत करतात.

केस काळे करण्यासाठी लागणारे साहित्य

फक्त आवळा पावडरच नव्हे, तर केस दीर्घकाळ काळे राहण्यासाठी खालील गोष्टींचाही वापर करावा लागेल –

4 चमचे आवळा पावडर

2 चमचे काळी जिरे (कलौंजी)

2 चमचे मेथी दाणे

3 चमचे मोहरीचे तेल

नैसर्गिक हेअर डाय कशी तयार करावी?

सगळ्यात आधी तव्यावर मेथी दाणे व कलौंजी भाजून घ्या, ते किंचित काळपट होईपर्यंत. भाजलेले दाणे मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर करून घ्या. आता कढई घ्या आणि त्यात आवळा पावडर व तयार केलेली मेथी-कलौंजी पावडर घालून हलक्या आचेवर भाजा.सर्व मिश्रण काळपट झाल्यावर ते एका डब्यात काढून ठेवा. वापरण्यासाठी एका वाटीत 3-4 चमचे ही तयार पावडर घ्या. त्यात मोहरीचे तेल घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट पांढऱ्या केसांवर लावा आणि 30 मिनिटे ते 1 तास सुकू द्या. वेळ पूर्ण झाल्यावर केस धुवा आणि फरक स्वतः अनुभवा – केस अधिक काळे आणि चमकदार दिसू लागतील. हा उपाय इतका प्रभावी आहे की महिनाभर पुन्हा वापरण्याची गरज भासत नाही. या सोप्या आणि नैसर्गिक उपायाने तुम्ही कोणतेही केमिकल न वापरता तुमचे पांढरे केस काळे आणि निरोगी ठेवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Natural remedy to turn white hair black, stop hair fall.

Web Summary : Combat premature graying with a natural hair dye using amla, kalonji, and fenugreek. This remedy strengthens hair, reduces hair fall, and restores natural color without harsh chemicals.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स