Join us

लांब- दाट आणि काळे केस मिळवण्यासाठी दोन आवळ्यांचा रोज 'असा' करा उपयाेग, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:33 IST

Amla For Hair Growth: केसांसाठी आवळ्यांचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आवळ्याचा वापर करून तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. अशात आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

Amla For Hair Growth: केस लांब आणि काळे करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी हेअर मास्क वापरतात तर कुणी वेगवेगळ्या तेलांचा वापर करतात. काही लोक केमिकल्सचा वापर करतात. पण यामुळे फायदा मिळतोच असं काही नाही. अशात तुम्ही एक नॅचरल उपाय करून केसांची लांबी वाढवू शकता आणि केस काळेही करू शकता. केसांसाठी आवळ्यांचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. आवळ्याचा वापर करून तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात. अशात आवळ्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

केसांसाठी आवळ्याचे फायदे

आवळ्यामध्ये वेगवेगळे गुण असतात. आवळ्याचा वापर केसांसोबतच, त्वचा आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही केला जाऊ शकतो. यातून शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी मिळतं. ज्यामुळे केसांची चांगली वाढही होते आणि केस मजबूतही होतात.

कसा कराल वापर?

आवळ्याचा योग्य पद्धतीनं वापर केला तर केसांना खूप फायदा मिळू शकतो. लांब आणि दाट केसांसाठी आवळा मास्कसारखा ना डोक्यावर लावायचा आहे, ना कच्चा खायचा आहे. आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे.

यासाठी रोज केवळ १ किंवा २ आवळी लागतील. आवळे कापून घ्या. त्यात कढीपत्याची काही पानं आणि थोडं आलं टाका. या गोष्टीसोबत मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून बारीक करा. तुमचा ज्यूस तयार आहे. यात थोडं मिठही टाकू शकता. रोज हा ज्यूस प्याल तर केसांची वाढ हईल.

कसा कराल स्टोर?

जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि रोज ज्यूस बनवणं शक्य नसेल तर याला स्टोर करूनही ठेवू शकता. तुम्ही जो ज्यूस तयार केला आहे, तो थोड्या प्रमाणात बनवा. हा स्टोर करण्यासाठी आइश ट्रेमध्ये टाका आणि बर्फासारखा गोठू द्या. जेव्हाही तुम्हाला ज्यूस प्यायचा असेल तर तेव्हा आइस क्यूब कोमट पाण्यात टाका. आइस क्यूब वितळल्यावर ज्यूस पिऊ शकता.

केसांसोबत त्वचेलाही फायदा

केसगळती रोखण्यासाठी आणि त्वचेवरील सुरकुत्या, पिंपल्स दूर करण्यासाठीही आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता. आवळ्याचा ज्यूस नियमितपणे प्यायल्यास त्वचेवरील डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

आरोग्याला फायदे

आवळ्याचा ज्यूस पिऊन त्वचेला आणि केसांना तर फायदा मिळतोच, सोबतच आरोग्यही चांगलं राहतं. या ज्यूसच्या माध्यमातून शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. शरीरातील हाडं मजबूत होतात आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स