Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरचे वांग- सुरकुत्या होतील कमी, २ रुपयांचा पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, येईल भरपूर तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 13:57 IST

How to get glass skin with Alum: Ayurvedic tips for glowing skin in Marathi:आपल्यालाही काचेसारखी नितळ आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुरटीचा हा नैसर्गिक उपाय नक्की करुन पाहा.

वाढते प्रदूषण, कडक ऊन आणि ताणतणावामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. अनेकदा महागडी ब्युटी प्रॉडक्ट्स वापरूनही चेहऱ्यावरील वांग (Pigmentation), काळे डाग आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी होत नाहीत.(Natural treatment for aging skin at home) उलट, त्यातील रसायनांमुळे त्वचेचे अधिक नुकसान होते. हार्मोनल बदलांमुळे नाकावर आणि गालावर वांग- सुरकुत्या दिसतात, जे सहजासहजी जात नाही. आपण या डागांना लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतो पण त्याचाही तात्पुरता रिजल्ट मिळतो.(Alum and rose water for face glow) अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरात किंवा देवघरात सहज उपलब्ध असणारी आणि केवळ २ रुपयांत मिळणारी 'तुरटी' (Alum) त्वचेसाठी एखाद्या वरदान ठरू शकते. आयुर्वेदात तुरटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुरटीमध्ये नैसर्गिक 'अ‍ॅस्ट्रिंजेंट' आणि 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म असतात, जे त्वचेला घट्ट (Tighten) करण्यास आणि डाग फिकट करण्यास मदत करतात.
तुरटी योग्य पद्धतीने वापरल्यास ती त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. जर आपल्यालाही काचेसारखी नितळ आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुरटीचा हा नैसर्गिक उपाय नक्की करुन पाहा. (Remove wrinkles naturally in 7 days)

काय सांगता, रेल्वेच्या डब्यांनाही असते एक्सपायरी डेट? रिटायर झालेल्या डब्यांचं पाहा पुढे नेमकं काय होतं..

1. चेहऱ्यावरील जुनाट वांग घालवण्यासाठी तुरटी रामबाण आहे. यासाठी तुरटीचा एक छोटासा तुकडा पाण्यात भिजवून ठेवा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हा ओला तुकडा हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा. २ ते ३ मिनिटे मसाज केल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचेच्या थरांमध्ये जाऊन मेलॅनिनचे प्रमाण नियंत्रित होते, ज्यामुळे वांगचे डाग कमी होतात. 

2. तुरटी पावडर गुलाबजलमध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, हलक्या हाताने मसाज करा. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. या उपायामुळे त्वचेवरील सुरकुत्या, काळे डाग फिके होऊन त्वचेचा रंग उजळतो. 

3. तुरटी पावडर, मुलतानी माती आणि पाणी एकत्र करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने डाग कमी होतील. 

4. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी झोपण्यापूर्वी तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचे मिश्रण लावायला हवे. १५ ते २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. या उपायांमुळे त्वचेला आर्द्रता मिळते. वय वाढल्यानंतर त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचा सैल पडू लागते ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या सहज दिसतात. स्किन टाइट करण्यासाठी एका बाऊलमध्ये चमचाभर तुरटी पावडर आणि दोन चमचे गुलाब पाणी मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यास चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतील. 

5. त्वचेला तेज येण्यासाठी तुरटी आणि मध यांचा वापर करायला हवा. मधातील ओलावा आणि तुरटीचे क्लिन्झिंग गुणधर्म एकत्र आल्यावर त्वचेला झटपट ग्लो मिळतो. अर्धा चमचा तुरटी पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावायला हवे. १० मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि नैसर्गिक चमक येते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Alum for Skin: Reduce Wrinkles and Pigmentation Naturally

Web Summary : Alum, a readily available ingredient, can reduce wrinkles, pigmentation, and dark spots. Its astringent and antibacterial properties tighten skin, improve circulation, and remove dead cells. Use it with rose water, honey, or multani mitti for a glowing complexion. Alum with coconut oil helps moisturize dry skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी