बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की त्यांना स्वत:साठी वेळच नसतो. मग अशावेळी पार्लरमध्ये जाणं, तिथे जाऊन स्वत:वर वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करून घेणं हे सगळं खूपच वेळखाऊ वाटायला लागतं. शिवाय या सगळ्या उपचारांवर भरमसाठ पैसे खर्च करण्याची इच्छाही नसते. अशावेळी एक अगदी सोपा आणि स्वस्तात मस्त उपाय करायचा असेल तर गुलाबपाणी आणि तुरटी यांचा त्वचेसाठी काही खास पद्धतींनी वापर करून पाहा. बघा त्वचेमध्ये किती छान बदल दिसायला लागेल.(skin care tips using alum or fitkari and rose water)
त्वचेसाठी तुरटी आणि गुलाबपाणी यांचा वापर कसा करायचा?
१. जर तुमच्या त्वचेवर खूप पिंपल्स यायला लागले असतील किंवा ओपन पोअर्स खूप जास्त दिसत असतील तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने तुरटी आणि गुलाबजल घेऊन घरच्याघरी टोनर तयार करा. यासाठी साधारण २ ते ३ चमचे एवढ्या गुलाबपाण्यात चिमूटभर तुरटीची पावडर घाला. तुरटीची पावडर गुलाब पाण्यात पुर्णपणे विरघळल्यानंतर ते स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्वचेवर त्याचा टोनरसारखा वापर करा. रात्री झोपण्यापुर्वी हे टोनर त्वचेवर शिंपडा. त्वचा छान फ्रेश, चमकदार दिसू लागेल.
२. चेहऱ्याला बर्फाने मालिश करणे खूप चांगले असते. कारण यामुळे त्वचेमध्ये रक्ताभिसरण चांगले होते आणि त्वचेवर छान ग्लो येतो.
व्यायाम, डाएट करूनही वजन कमी का होत नाही? पाहा ३ कारणं- बघा काय करायचे उपाय
यासाठी वर सांगितल्याप्रमाणेच २ ते ३ चमचे गुलाबपाणी आणि चिमूटभर तुरटी पावडर अशा प्रमाणात गुलाबजल आणि तुरटी एकत्र करा. त्यांच्यापासून बर्फ तयार करा. हा बर्फ आठवड्यातून एकदा तुमच्या चेहऱ्यावर फिरवून हलक्या हाताने मसाज करा. त्वचेवर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येईल.
