केसगळतीच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत की टक्कलच पडते की काय अशी भीती वाटू लागली आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे केसांवर त्याचा जास्त प्रमाणात प्रभाव पडतो.(aloe vera for hair) बाहेरचे प्रदूषण, जंकफूड, अपुरी झोप, जास्त ताण घेतल्यावर केसगळती वाढते. इतकेच नाही तर महिन्याला महिना आपण पार्लरमध्ये जाऊन केसांना ट्रिम करणं, हिट स्प्रे वापरणं यामुळे केसांच्या समस्या आणखी वाढतात. (aloe vera hair mask)
केसांच्या टोकांना फाटे फुटतात, केस तुटतात आणि आणि हळूहळू केस गळतीही वाढते. यामागे अनेक कारणं असतात. केमिकल्स, उष्णता, प्रदूषण, चुकीची काळजी किंवा पोषणाचा अभाव. पण या सगळ्यावर घरच्या घरी एक साधा, स्वस्त आणि प्रभावी उपाय म्हणजे कुंडीतला कोरफड. (frizzy hair solution)
कर्नाटकातील उड्डपी स्टाईल सांबार करा घरीच, कुकरमध्ये १५ मिनिटांत होईल, चविष्ट सांबारची सोपी रेसिपी
आपल्याला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर घरच्या घरी काही सोप्या पद्धतीने केसांची काळजी घेऊ शकता. यासाठी आपल्याला कोरफडीच्या गरात काही पदार्थ मिसळावे लागतील. कोरफडीचा गर, उकडलेला भात, दूध आणि नारळाचे तेल लागेल यानंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये घाला. सर्व नीट बारीक करुन त्याची पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांना किमान १ तास लावा. नंतर केस स्वच्छ धुवा.
या हेअर मास्कने केसांना जबरदस्त फायदा होईल. कोरफडीचा गर केसांना खोलवर हायड्रेट करतो. टाळूला आराम देतो, केस गळती कमी होत आणि नैसर्गिक चमक वाढते. तांदळात असणारे अमिनो आम्ल हे केसांना मजबूत करण्याचे काम करतात. तसेच रखरखीत झालेल्या केसांना गुळगुळीत करतात. केसांचा पोत सुधारुन तुटणं देखील कमी होतं.
दूध हे केसांना चांगले पोषण देते. ज्यामुळे ते अधिक गुळगुळीत आणि रेशमी होतात. तर नारळाचे तेल हे मुळांच्या खोलवर जाते. कोरडपणा दूर करते आणि केसांची चमक वाढवते. जर केस खूपच कोरडे आणि रफ असतील, तर कोरफडीत थोडंसं नारळाचं तेल किंवा बदाम तेल मिसळू शकता. यामुळे केसांना अधिक पोषण मिळतं आणि टोकांना नैसर्गिक चमक येते. काही आठवड्यांत केस मऊ, आणि वाढण्यास मदत होईल.
