स्त्री असो किंवा पुरुष आपल्या स्किनची काळजी प्रत्येकजण घेतोच. परंतु विशेषतः महिलावर्ग आपल्या स्किनची अधिक जास्त काळजी घेतात. आपण सुंदर दिसावं यासोबतच आपल्याला कोणत्याही प्रकारचे स्किन प्रॉब्लेम्स होऊ नयेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. यासाठीच महिला स्किन केअर करताना वेगवेगळ्या प्रकारचे उपाय, स्किन केअर प्रॉडक्ट्स (How to Use a Bubble Gum Face Mask) तसेच अनेक ब्यूटी ट्रीटमेंट्स किंवा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. सध्या बदलत्या काळानुसार स्किन केअरसाठी दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारच्या ब्यूटी ट्रिटमेंट्स समोर येत आहेत. यातील काही ब्यूटी ट्रिटमेंट्स या आपल्या परिचयाच्या असतात तर नाही ट्रिटमेंट्सची नाव देखील आपल्याला नवी असतात(Tips & Tricks Bubble Gum Face Mask New Trend For Glowing & Clean Skin).
सध्या अशीच एक खास ब्यूटी ट्रिटमेंट फार मोठ्या प्रमाणांत ट्रेण्डिंगवर आहे ती म्हणजे, 'बबल गम फेसमास्क'. आपण सगळ्यांनीच आपल्या लहानपणी बबल गम खाल्लंच असेल. या ब्यूटी ट्रिटमेंटच नाव ऐकलं की, आपल्या डोळ्यासमोर तेच ते लहानपणीच फिकट गुलाबीसर रंगाचं बबल गम आठवत. असे असले तरीही हे 'बबल गम फेसमास्क' (Bubble Gum Face Mask) म्हणजे नेमकं आहे तरी काय, तसेच या ब्यूटी ट्रिटमेंटचा नेमका फायदा तरी काय किंवा ही ट्रिटमेंट कशी करतात याबद्दल अधिक माहिती समजून घेऊयात.
बबल गम फेस मास्क म्हणजे काय?
बबल गम फेस मास्क हे एक विशेष प्रकारचे त्वचेची काळजी घेणारे ब्यूटी प्रॉडक्ट आहे. जे त्वचेवर लावल्यावर फेसच्या रुपांत लहान लहान फुगे तयार होण्यास सुरुवात होते. हा फोम त्वचेत खोलवर जाऊन डेड स्किन आणि त्वचेतील अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यास मदत करते. या मास्कला 'बबल गम' असे नाव देण्यात आले कारण हा मास्क त्वचेवर लावल्यानंतर हलकासा गुलाबी रंग येतो आणि हा मास्क काहीसा बबल गमसारखा दिसतो.
आंघोळीच्या पाण्यांत टाका ही जादुई पोटली, त्वचेच्या समस्या होतील गायब - त्वचा दिसेल अधिकच सुंदर...
या फेसमास्कमध्ये ऑक्सिजन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जे त्वचेचे छिद्र उघडण्याचे आणि त्यांना खोलवर स्वच्छ करण्याचे काम करते. हा मास्क कोरड्या, तेलकट आणि संवेदनशील त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे, कारण तो त्वचेला हायड्रेट करतो तसेच ती आतून खोलवर स्वच्छ करतो.
बबल गम फेस मास्कचे फायदे :-
१. बबल गम फेस मास्क त्वचेतील अतिरिक्त घाण, जास्तीचे तेल आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतो. ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसते.
२. हा मास्क त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो आणि त्वचा कोरडी आणि खडबडीत होण्यापासून रोखतो. ज्यांची त्वचा वारंवार कोरडी होते त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.
३. त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
४. हा मास्क त्वचेला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
आयब्रोज खूपच पातळ आहेत? महाग ब्यूटी ट्रिटमेंट्स नको तर करा ७ उपाय, भुवया दिसतील दाट...
पांढऱ्या केसांना डाय लावायची भीती वाटते? बिटाचा रस 'या' पद्धतीने लावा - केसांना मिळेल सुंदर रंग...
बबल गम फेसमास्क कसा वापरायचा ?
सगळ्यांत आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि हा मास्क थोडासा ओलसर असलेल्या चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यासोबतच समान रीतीने मानेवर देखील पसरवा आणि ते लावल्यानंतर, काही सेकंदातच त्यावर फेस (फुगे) तयार होण्यास सुरुवात होईल. हा मास्क चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे राहू द्या जेणेकरून, त्वचा खोलवर स्वच्छ होऊ शकेल. जेव्हा बुडबुडे पूर्णपणे तयार होतात, तेव्हा त्यांना हातांनी हलक्या हाताने मालिश करून स्वच्छ करा. आता चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि हलके मॉइश्चरायझर लावा.