वय वाढू लागलं की, आरोग्याच्या अनेक तक्रारी देखील वाढतात.(Natural beauty hacks) आपला चेहरा हा आपल्या आरोग्याचा आरसा समजला जातो. हल्ली ऐन तारुण्यात अनेकांना भुवयांचे केस पांढरे होणे, विरळ होणे किंवा गळण्याचा त्रास होतो. चेहऱ्याच्या सौंदर्यात भुवया आणि पापण्या महत्त्वाची भूमिका बजावतात. (Eyebrow care tips) पल्या भुवयांचे केस दाट, काळेभोर आणि भरीव असेल तर चेहरा आणि डोळे अधिक खुलून दिसतात. पण अनेकदा भुवयांचे केस पांढरे दिसू लागली की आपले सौंदर्य हरवून गेल्याची भीती वाटते. (Home remedies for eyebrows)
शरीरातील हार्मोनल बदल, स्ट्रेस, पोषणाची कमतरता आणि केमिकल्स ब्यूटी प्रॉडक्टसच्या अतिवापरामुळे आपल्या भुवयांच्या केसांवर परिणाम होतो. (Eyebrow growth tips) ते निस्तेज, पांढरे आणि विरळ होऊ लागतात. अशावेळी आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स किंवा भुवयांचे पांढरे केस काढून टाकतो. पण इतके पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यास आपल्या भुवयासह पापण्यांच्या केसांचं हरवलेलं सौंदर्य पुन्हा आणू शकतो. (White eyebrow hair remedy)
नाजूक भागाभोवतीची त्वचा काळी पडली, खाज सुटते? ४ उपाय - आठवड्याभरात काळपटपणा होईल दूर
प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर मनप्रीत कौर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या म्हणतात एका लसणाच्या पाकळीने आपण भुवयांचे पांढरे केस काळे करु शकतो. यासाठी आपल्याला १ लसूण पाकळी, १ बदाम, १ चमचा एरंडीचे तेल, अर्धा चमचा बदाम तेल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मेणबत्ती जाळून त्यावर लसणाची पाकळी आणि बदाम जाळावे लागतील. ते काळे झाल्यानंतर दोन्ही बारीक वाटून घ्या. त्यात चमचाभर एरंडीचे तेल आणि अर्धा चमचा बदाम तेल घाला, यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील घालू शकतो. व्यवस्थित सर्व एकजीव करुन रोज रात्री भुवयांवर घट्ट लावा. सकाळी थंड पाण्याने स्वच्छ करा. असं केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
लसणात नैसर्गिक सल्फर असते. जे केसांची वाढ लवकर होण्यास आणि मुळांपासून काळे करण्यास मदत करते. बदाम खाण्याव्यतिरिक्त ते लावण्याचा देखील फायदा आहे. यात व्हिटॅमिन ई आणि निरोगी फॅटी अॅसिड असतात जे भुवयांचे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करतात.