Join us

कमी वयात केस पिकलेत? काळ्याभोर, लांब केसांसाठी जावेद हबीब सांगतात खास आयुर्वेदीक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:40 IST

How to turn grey hairs into black : केसांना काळे करण्यासाठी इंडिगो पावडरचा वापर योग्य पद्धतीनं कसा करायचा याबाबत त्यांनी सांगितले आहे. (indigo powder for black hair) 

आजकाल कमी वयातच लोकांचे केस पांढरे होत आहे.  विविध उपाय करूनही केसांवर हवातसा परिणाम दिसत नाही. हिटींग टुल्सचा वापर, केमिकल्सयुक्त शॅम्पूमुळे केस अकाली पांढरे होतात. केस पांढरे होऊ नयेत म्हणून प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Hair stylist Jawed Habib) यांनी काही काही उपाय सुचवले आहेत. केसांना काळे करण्यासाठी इंडिगो पावडरचा वापर योग्य पद्धतीनं कसा करायचा याबाबत त्यांनी सांगितले आहे. (indigo powder for black hair) 

एका भांड्यात कोऱ्या चहात मेंदी पावडर मिसळा आणि भिजत ठेवा. स्वच्छ केसांवर मेंदीची पेस्ट लावा आणि 45 मिनिटे राहू द्या.नंतर पाण्याने चांगले धुवा, शॅम्पू वापरू नका. केस धुतल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. पाण्यात इंडिगो पावडर टाकून बारीक पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना मुळापासून टोकापर्यंत एकाच वेळी लावा. गडद काळा रंग येण्यासाठी ४५ मिनिटे ते २ तास राहू द्या. नंतर पाण्याने चांगले धुवा.  दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूने केस धुवा. (Natural Home Remedies For Grey Hair by expert jawed habib)

इंडिगो पावडरचे फायदे

- इंडिगो पावडर केस गळणं थांबवते. इंडिगो पावडर तेलात मिसळून स्काल्पला हळूहळू मसाज केल्यानं केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणं थांबते.

- इंडिगो पावडरचा रंग नैसर्गिक आहे आणि तुमच्या केसांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकत नाही. याशिवाय, हे तुमचे केस दीर्घकाळ काळे ठेवण्यास मदत करेल आणि हानिकारक देखील नाही.

- इंडिगो पावडर कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी झपाट्याने काम करते. ते प्रथम तुमची टाळू स्वच्छ करते.  घाण आणि तेलामुळे खराब झालेल्या केसांना जीवदान देते आणि नंतर केसांमधून बाहेर पडणारे अतिरिक्त तेल कमी करण्यास देखील ही उपयुक्त आहे.

इंडिओ पावडर वापरण्याआधी या टिप्स लक्षात ठेवा.

१) इंडिओ पावडर वापरण्याआधी क्वालिटी चेक करणं गरजेचं आहे.

२) इंडिओ हेअर पॅक लावण्याआधी केसांना व्यवस्थित धुवून सुकवून घ्या आणि नंतर स्वच्छ पाण्यानं केस धुवा.

३) इंडिगो पावडरमध्ये मध किंवा अंड मिसळून नका, यामुळे याचा रंग बदलू शकतो.

४) इंडिओ पावडरचा रंग ५ ते १० मिनिटात गडद होतो. त्यासाठी मेहेंदीप्रमाणे रात्रभर भिजवून ठेवण्याची आवश्यकता नाही.

५) इंडिगो पावडरचा रंग केसांना सात ते नऊ आठवड्यांपर्यंत राहतो

६) इंडिगो पावडर पाण्यात मिसळल्यानंतर त्वरीत केसांना लावा. जास्तवेळ बाहेर ठेवल्यास ही पावडर ऑक्सिडाईज होते. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स