केस तुटणं, केस गळण्याची समस्या आजकाल प्रत्येकालाच उद्भवते. महिला तसंच पुरूषांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. केस एकदा गळायला लागले की कोणतेही शॅम्पू, सिरम वापरले तरी केस गळतच राहतात. केस तुटणं, केस गळणं तसंच केसांमध्ये कोंडा होणं या समस्या अनेकांना उद्भवतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही खास टिप्सचा वापर करायला हवा. ज्यामुळे लांबसडक, दाट केस मिळतील. (How To Treat Thin Hair Content Creator Prasanna Kumar Lucky Shared Best Ayurvedic Remedy For Long Hair)
इंस्टाग्रामवर प्रसन्न कुमार नावाच्या मुलानं लांब काळे दाट केस होण्यासाठी काय करता येईल याबाबात सांगितल आहे. दाट केसांसाठी काही आयुर्वेदीक उपाय फायदेशीर ठरतात. हे उपाय नेमके कोणते ते समजून घेऊ. केसांच्या वाढीसाठी तुम्हाला आयुर्वेदीक उपाय करायचा असेल तर त्यासाठी जास्वंदाची फुलं, कढीपत्ते थोडं पाणी घालून वाटून मुलायम पेस्ट तयार करून घ्या. जटामांसी, भृंगराज आणि आवळा पावडर मिसळा, दही किंवा एलोवेरा जेल यात घाला. सर्व पदार्थ एकजीव करून एक घट्ट पेस्ट तयार करा.
हा उपाय करण्यासाठी ही पेस्ट संपू्र्ण स्काल्प आणि केसांना लावा. ही पेस्ट 30 ते 45 मिनिटं अशीच राहू द्या. नंतर कोमट पाणी आणि हलक्या हर्बल शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. 1 ते 2 आठवड्यात स्काल्प डिटॉक्स, स्काल्प स्वच्छ वाटणं केस गळती कमी होणं असे बदल दिसून येतील. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात केसांची मुळे मजबूत होतील.
तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात केसांची मुळं मजबूत होतील. ज्यामुळे केस गळणं कमी होईल आणि केस नैसर्गिकरित्या चमकतील. पाचव्या आणि सहाव्या आठवड्यात केस पुन्हा उगवायला सुरूवात होईल. ज्यामुळे केस दाट दिसतील आणि केस कमी प्रमाणात पांढरे होतील. आठव्या आणि सातव्या आठवड्यात केस दाट, काळे आणि निरोगी दिसायला लागतील. या स्थितीत केस कमीत कमी पातळ होतील.
या गोष्टींची काळजी घ्या
स्काल्पवर हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. कोरड्या स्काल्पसाठी एलोवेरा जेलचा वापर करा. १ छोटा चमचा नारळाचे तेल यात मिसळा. ऑयली स्काल्पसाठी जास्तीत जास्त आवळा पावडर आणि कमी दह्याचा वापर करा. हा उपाय नियमित केल्यानं केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.
Web Summary : Suffering from hair fall? An Instagram user suggests an Ayurvedic remedy using hibiscus, curry leaves, and amla powder. Apply the paste for 30-45 minutes, wash with herbal shampoo. Results include scalp detox, reduced hair fall, and stronger roots.
Web Summary : बालों के झड़ने से परेशान हैं? एक इंस्टाग्राम यूजर गुड़हल, करी पत्ते और आंवला पाउडर का उपयोग करके एक आयुर्वेदिक उपाय बताता है। पेस्ट को 30-45 मिनट के लिए लगाएं, हर्बल शैम्पू से धो लें। परिणामों में खोपड़ी की डिटॉक्स, बालों का झड़ना कम होना और जड़ें मजबूत होना शामिल हैं।