Join us

थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेवर सूज येते- पुरळ आल्यासारखं दिसतं? ३ उपाय- अजिबात त्रास होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2024 16:13 IST

How To Treat Face Bumps After Threading: आयब्रोज किंवा थ्रेडिंग केल्यानंतर जर तुम्हालाही काही त्रास होत असेल तर हे काही उपाय करून पाहा..(home remedies for redness of skin after making eyebrows)

ठळक मुद्देकाही जणींची भुवयांच्या आसपासची त्वचा सुजल्यासारखी होते, लाल दिसते.

आपला चेहरा आकर्षक दिसण्यासाठी भुवयांना आणखी रेखीव केले जाते. यालाच थ्रेडिंग करणे किंवा आयब्रोज करणे असं आपण म्हणतो. बहुतांश महिला तर अशा असतात की त्या एरवी पार्लरमध्ये जाऊन कधीच कोणती ब्यूटी ट्रिटमेंट करून घेत नाहीत. पण आयब्रोज मात्र अगदी नियमितपणे करतात. कारण फक्त तेवढंच केलं तरी चेहऱ्याच्या रेखीवपणात बरीच भर पडते. पण बऱ्याच जणींना थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांच्या भोवतीच्या त्वचेवर बारीक फोड आल्यासारखं दिसतं. किंवा काही जणींची भुवयांच्या आसपासची त्वचा सुजल्यासारखी होते, लाल दिसते (How To Treat Face Bumps After Threading). असा त्रास होऊ नये म्हणून थ्रेडिंग केल्यावर नेमकी कोणती काळजी घ्यायची ते पाहा..(home remedies for redness of skin after making eyebrows)

 

थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेवर सूज येऊ नये म्हणून...

१. गुलाब पाणी 

थ्रेडिंग करताना जेव्हा दोऱ्याने त्वचा ओढली जाते तेव्हा ती बऱ्याच प्रमाणात दुखावली जाते. शिवाय त्या भागातली त्वचा जरा जास्तच नाजूक असल्याने ती लालसर होते.

हिवाळ्यात भरभरून फुलं देणारी ५ रोपं नक्की लावा; रंगबेरंगी फुलांनी बहरून जातील कुंड्या...

या दुखावलेल्या त्वचेला थंडावा देण्यासाठी थ्रेडिंग केल्यानंतर लगेचच त्या भागात थोडं गुलाब पाणी लावा. गुलाबपाणी लावताना ते आधी एका स्वच्छ सुती कपड्यावर किंवा कापसावर घ्या आणि हळूहळू त्वचेला लावा.

 

२. बर्फ

आयब्रोज केल्यानंतर दुखावलेल्या त्वचेला आराम देण्यासाठी बर्फ लावणेही खूप फायद्याचे ठरते.

स्वेटर चांगल्या क्वालिटीचं आहे, हे कसं ओळखाल? लहान मुलांसाठी स्वेटर घेताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

हा उपाय करण्यासाठी बर्फाचा तुकडा आधी एका कपड्यावर घ्या आणि त्यानंतर कपड्यात गुंडाळलेला बर्फ भुवयांभोवती हळुवारपणे फिरवा. हा उपाय केल्याने त्या भागातली रक्ताभिसरण क्रिया लगेच सुरळीत होते आणि त्वचेचा लालसरपणा, सूज कमी होते. 

 

३. ॲलोव्हेरा जेल

थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांभोवतीच्या त्वचेवर थोडं ॲलोव्हेरा जेल लावल्यानेही खूप फायदा होतो.

रात्री गारेगार थंडीत प्या गरमागरम सूप! हिवाळ्यात ताकद देणारे ५ सूप, पाहा रेसिपी-उबदार आणि चविष्ट

यामुळे लगेचच त्वचेचा दाह कमी होऊन थंडावा मिळतो. ॲलोव्हेरा जेल नसल्यास कोरफडीचा ताजा गर काढून डोळ्यांभोवती मसाज केली तरी चालेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी