उन्हातून किंवा बाहेरुन आल्यानंतर आपण अनेकदा चेहरा स्वच्छ करतो. सुंदर आणि स्वच्छ त्वचेसाठी अनेक जण चेहरा जास्त घासतात, स्क्रब वापरतात किंवा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स लावतात. पण याचा अतिप्रमाणात वापर झाला की उलटा परिणाम दिसू लागतो.(dry skin in winter) त्वचा कोरडी पडणं, लालसर होणं, जळजळ होणं आणि त्यासोबतच नैसर्गिक चमकही निघून जाते. (coconut oil for skin)जास्त घासल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ऑइल लेयर निघून जातो. ज्यामुळे त्वचा रुक्ष, निस्तेज आणि थकलेली दिसते. यावेळी त्वचेला पुन्हा मॉइश्चरायझ करणं खूप महत्त्वाचं असतं.(winter skincare tips) यासाठी नारळाचे तेल एक चांगला आणि उत्तम पर्याय मानला जातो. जर आपली त्वचा कोरडी, रखरखीत किंवा ओढल्यासारखी वाटत असेल तर नारळाच्या तेलात ५ रुपयांची गोष्ट मिसळा.
बाजारातून भेसळयुक्त पीठ खरेदी करण्याची गरज नाही, घरीच करा पौष्टिक मल्टीग्रेन पीठ- सोपी रेसिपी
शरीरावर साचलेली घाण काढून टाकण्यासाठी आपण अनेकदा साबण किंवा इतर गोष्टींचा वापर करतो. यामुळे घाण निघून जाते. जोरात घासल्यामुळे त्वचेची साल निघून जाते, ज्यामुळे त्वचा लालसर आणि सोललेली दिसते. नारळाच्या तेलात काही घटक मिसळल्यास घरगुती बॉडी स्क्रब तयार होईल. ज्याच्यामुळे आपली त्वचा पुन्हा नव्यासारखी चमकेल.
स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला २ चमचे तांदळाचे पीठ, २ चमचे साखर, कॉफी, नारळाचे तेल आणि गुलाब पाणी लागेल. हे स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यात तांदळाचे पीठ, साखर आणि कॉफी मिक्स करावी लागेल. याची पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात नारळाचे तेल आणि गुलाबजल घाला. तयार बॉडी स्क्रब आपण संपूर्ण शरीराला लावू शकतो.
हिवाळ्यात त्वचा काळी, कोरडी किंवा रखरखीत होते. अशावेळी आठवड्यातून एकदा हा उपाय आपण करु शकतो. ज्यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होईल. त्वचेला मॉइश्चर मिळाल्यानंतर कोरडेपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. केमिकल्स उत्पादने वापरण्याऐवजी घरगुती उपाय ट्राय करुन पाहा.
Web Summary : Combat dry winter skin with a homemade coconut oil scrub. Mix coconut oil with rice flour, sugar, coffee, and rose water for a radiant, moisturized complexion. Patch test before use.
Web Summary : सर्दियों में रूखी त्वचा से लड़ने के लिए घर का बना नारियल तेल स्क्रब। चमकदार, नमीयुक्त रंगत के लिए नारियल तेल को चावल के आटे, चीनी, कॉफी और गुलाब जल के साथ मिलाएं। उपयोग करने से पहले पैच टेस्ट करें।