Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > टाचांना भेगा पडल्या, रक्त निघतंय? रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हा' पांढरा पदार्थ, त्वचा होईल मुलायम

टाचांना भेगा पडल्या, रक्त निघतंय? रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हा' पांढरा पदार्थ, त्वचा होईल मुलायम

Cracked heels: Heel cracks remedy: Home remedy for cracked heels: Dry feet solution: काही घरगुती सोपे उपाय केले तर टाचांच्या भेगा भरुन निघतील तसेच त्वचा मऊ होण्यास मदत होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2025 13:04 IST2025-12-21T13:03:34+5:302025-12-21T13:04:05+5:30

Cracked heels: Heel cracks remedy: Home remedy for cracked heels: Dry feet solution: काही घरगुती सोपे उपाय केले तर टाचांच्या भेगा भरुन निघतील तसेच त्वचा मऊ होण्यास मदत होतील.

How to treat cracked heels with bleeding at Home Best home remedy for cracked heels before bedtime coconut oil remedy for cracked heels | टाचांना भेगा पडल्या, रक्त निघतंय? रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हा' पांढरा पदार्थ, त्वचा होईल मुलायम

टाचांना भेगा पडल्या, रक्त निघतंय? रात्री झोपण्यापूर्वी टाचांना लावा 'हा' पांढरा पदार्थ, त्वचा होईल मुलायम

ऋतू कोणताही असला तरी अनेकांना टाचांना भेगा पडण्याची समस्या त्रास देऊ लागते. पाय अचानक कोरडे पडतात, टाचा कडक होतात, चिरा पडतात, चालताना वेदना होतात तर अनेकदा यातून रक्तदेखील निघू लागते. या सगळ्या त्रासाकडे आपण दुर्लक्ष करतो.(Cracked heels) बरेचदा आपण टाचांना महागडी क्रीम, लोशन किंवा औषध लावतो.(Heel cracks remedy) चुकीची चप्पल निवडणे, पायांची योग्य निगा न राखणे, शरीरात पाण्याची कमतरता, साबण किंवा केमिकलयुक्त क्लिन्झरचा जास्त वापर केल्याने पायांच्या टाचा खराब होतात. त्वचा कोरडी पडून त्यातील लवचिकता कमी होते आणि हळूहळू भेगा पडू लागतात.(Home remedy for cracked heels) अशावेळी महागडी क्रीम देखील पायांना हवं तसं पोषण देत नाही. पण आपण काही घरगुती सोपे उपाय केले तर टाचांच्या भेगा भरुन निघतील तसेच त्वचा मऊ होण्यास मदत होतील. 

टपरीवर मिळतो तसा फक्कड मसाला चहा करा घरीच, पंकज त्रिपाठींनी शेअर केली खास ट्रिक, चहा होईल घट्ट

टाचांची काळजी घेण्यासाठी आपल्याला मोहरीचे तेल २ चमचे, नारळाचे तेल २ चमचे, पेट्रोलियम जेली २ चमचे, अर्धी कापराची वडी, व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागेल. कापूर हा आयुर्वेदात आणि घरगुती उपचारांमध्ये आधीपासून वापरला जातो. कापरात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे जखम स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तसेच कापूर त्वचेत रक्तसंचार वाढवतो, त्यामुळे कोरडी आणि फाटलेली त्वचा लवकर बरी होण्यास मदत मिळते.

आपल्याला वरील सर्व साहित्य मिक्स करुन त्याची क्रीम बनवावी लागेल. त्यानंतर काचेच्या बाटलीत भरुन साठवू शकता. टाचांना ही क्रीम लावण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा. व्यवस्थित पुसून घ्या. नंतर ही क्रीम पायांना लावा. दिवसातून दोन वेळा ही क्रीम पायांना लावल्यास भेगा पडलेल्या टाचा बऱ्या होण्यास मदत होईल. तसेच पायांची त्वचा मऊ होईल. 

हा घरगुती उपाय रोज काही दिवस केला तर टाचांचा कोरडेपणा हळूहळू कमी होईल. तसेच भेगा भरु लागतील आणि चालताना होणऱ्या वेदनाही कमी होतील. पण पायांतून जास्त रक्त येत असेल किंवा मधुमेहासारखा आजार असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
 

Web Title : फटी एड़ियों के लिए घरेलू उपाय: रात भर में पाएं मुलायम त्वचा।

Web Summary : क्या फटी एड़ियों से परेशान हैं? सोने से पहले सरसों और नारियल तेल, पेट्रोलियम जेली, कपूर और विटामिन ई से बनी क्रीम लगाएं। नियमित उपयोग से त्वचा मुलायम होती है और दरारें ठीक होती हैं। गंभीर मामलों के लिए डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Heal cracked heels with this overnight home remedy for soft skin.

Web Summary : Cracked heels troubling you? Apply a homemade cream of mustard and coconut oil, petroleum jelly, camphor, and vitamin E before bed. Regular use softens skin and heals cracks. Consult a doctor for severe cases.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.