हिवाळा सुरु झाला की आपल्या त्वचेमध्ये बदल पाहायला मिळतो. त्यातीलच एक सगळ्यात मोठी समस्या टाचा फुटणे. विशेषतः हिवाळ्यात, थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे टाचांची त्वचा कोरडी पडून तडकू लागते.(cracked heels remedy) अशावेळी आपण काही महागड्या क्रीम्स, औषधांचा वापर करतो. पण काही केल्या फरत दिसतं नाही. (homemade foot mask)घरात शेंगदाणे खाल्ल्यानंतर त्याची टरफले थेट कचर्यात टाकली जातात. पण हीच टरफले फाटलेल्या टाचांसाठी रामबाण ठरू शकतात.(peanut shells benefits) सतत चालणे, उघड्या चपला वापरणे, पाण्याचा जास्त संपर्क, कोरडी त्वचा किंवा योग्य काळजी न घेतल्यामुळे टाचांना भेगा पडतात. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटतो; पण हळूहळू टाचांमध्ये खोल भेगा पडतात, वेदना होतात आणि चालणंसुद्धा अवघड होतं. अनेक जण यावर महागडे फुट क्रीम, पार्लर ट्रीटमेंट्स किंवा रासायनिक उत्पादने वापरतात. मात्र, घरातच सहज मिळणाऱ्या गोष्टींमधून हा त्रास कमी करता येतो, याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. शेंगांच्या टरफल्यांपासून फूट मास्क कसा तयार करायचा पाहूया.
५० रुपये खर्च आणि घ्या हळदी- कुंकवाच्या वाणासाठी १० हटके पर्याय, कमी खर्चात- कामाची वस्तू
शेंगांच्या टरफल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक तेल असतात जे कोरड्या त्वचेला आतून दुरुस्त आणि बरे करतात. तसेच भेगा पडलेल्या पायांना देखील बरे करतात. यासाठी आपल्याला १ वाटी धुवून वाळवलेले शेंगाचे टरफले, १ चमचा मध, २ चमचे नारळाचे तेल आणि कच्चे दूध लागेल.
मॅजिक फूट मास्क बनवण्यासाठी वाळवलेल्या शेंगांच्या टरफलांना मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची पावडर बनवा. त्यानंतर एका भांड्यात २ चमचे शेंगदाण्याच्या कवचाची पावडर , नारळाचे तेल आणि मध घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. यात थोडे कच्चे दूध घालून जाड पेस्ट तयार करता येईल. तयार होईल मॅजिक फूट मास्क.
सगळ्यात आधी आपल्याला पाय कोमट पाण्यात ५ मिनिटे बुडवावे लागतील. तयार केलेली पेस्ट आपल्याला टाचांना आणि पायांना लावा. ५ ते ६ मिनिटे हालचालीत हळूवारपणे स्क्रब करा. यामुळे पायांची मृत त्वचा निघून जाते. स्क्रब केल्यानंतर या पेस्टचा जाड थर टाचांवर लावा. स्क्रब केल्यानंतर हा फूट मास्क १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या.
२० मिनिटानंतर पाय स्वच्छ धुवून व्हॅसलीन लावा आणि सॉस घाला. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करुन पाहिल्यास आपल्याला आराम मिळेल. शेंगांची टरफले मृत त्वचेच्या पेशी हळूवारपणे काढून टाकते. ज्यामुळे कोणतीही जळजळ होत नाही. आपण रोज फेकून देत असलेली शेंगदाण्याची टरफले जर योग्य पद्धतीने वापरली, तर ती तुमच्या पायांसाठी वरदान ठरू शकतात.
Web Summary : Cracked heels bothering you? Use peanut shells! Make a foot mask with shell powder, coconut oil, honey, and milk. Exfoliate, apply, and moisturize. Repeat twice weekly for soft, healed feet.
Web Summary : फटी एड़ियों से परेशान हैं? मूंगफली के छिलके का उपयोग करें! छिलके के पाउडर, नारियल तेल, शहद और दूध से फुट मास्क बनाएं। एक्सफोलिएट करें, लगाएं और मॉइस्चराइज़ करें। मुलायम, ठीक एड़ियों के लिए सप्ताह में दो बार दोहराएं।