Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्याची लटकणारी त्वचा पुन्हा होईल टाईट! रुपयाचाही खर्च नाही 'असा' उपाय - चाळिशीत दिसाल विशीतल्या तरुणीसारख्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 11:05 IST

how to tighten loose skin naturally : home remedies for skin tightening : face skin tightening home remedy : स्वयंपाक घरातील विशिष्ट पदार्थांच्या मदतीने सैल पडलेल्या त्वचेला पुन्हा पहिल्यासारखा तजेलदारपणा आणि घट्टपणा देऊ शकता...

वाढत्या वयोमानानुसार आपल्या त्वचेत नैसर्गिक बदल होऊ लागतात. वय वाढू लागलं की त्याचे पहिले परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतात. वयोमानानुसार शरीरातील कोलाजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचा हळूहळू आपली लवचिकता गमावते आणि सैल पडू लागते. चेहऱ्याची त्वचा लोंबकणे किंवा सुरकुत्या पडणे यामुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो आणि आपण वयापेक्षा मोठे दिसू लागतो. चेहऱ्याची त्वचा एकदा का सैल पडली की, आपला संपूर्ण चेहरा थकलेला आणि विचित्र दिसू लागतो. त्वचेचा घट्टपणा कमी झाल्याने सुरकुत्या, लूज स्किन आणि निस्तेजपणा दिसू लागतो, ज्यामुळे संपूर्ण लूकवर परिणाम होतो. त्यामुळे अनेकजणी पुन्हा त्वचा टाईट करून तरुण दिसण्यासाठी विविध उपाय करतात. परंतु सैल पडलेली त्वचा पुन्हा टाईट करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातीलच काही पदार्थ फायदेशीर ठरतात(how to tighten loose skin naturally).

मुंबईतील 'Eatfit 24/7' च्या फाऊंडर श्वेता शाह यांनी सैल पडलेली त्वचा घरच्याघरीच पुन्हा टाईट करण्यासाठी 'होममेड कोलाजन बाम' (Homemade Collagen Balm) कसा तयार करायचा याचा खास उपाय शेअर केला आहे. स्वयंपाक घरातील काही विशिष्ट पदार्थांच्या मदतीने सैल पडलेल्या त्वचेला पुन्हा पहिल्यासारखा (home remedies for skin tightening) तजेलदारपणा आणि घट्टपणा देऊ शकतात. असा एक खास पण फायदेशीर घरगुती उपाय आहे, जो सैल पडलेली त्वचा पुन्हा टाईट (face skin tightening home remedy) करण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी मदत नक्की मदत करेल. 

सैल पडलेल्या त्वचेसाठी खास होममेड कोलाजन बाम... 

सैल पडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी टाईट आणि तरुण दिसावी म्हणून होममेड कोलाजन बाम तयार करण्यासाठी आपल्याला २ टेबलस्पून तांदुळाचे पाणी, १ टेबलस्पून एलोवेरा जेल आणि १ व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

वेणी दिसते पातळ दोरीसारखी नाजूक ? केसांचा विरळपणा कमी करणार घरगुती तेल - केसगळती थांबून वेणीही दिसेल जाडजूड...  

होममेड कोलाजन बाम कसा तयार करायचा ? 

हा कोलाजन बाम तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 'राईस वॉटर' तयार करावे लागेल. अर्धा कप पाण्यात तांदूळ ३० मिनिटे भिजत ठेवा. ३० मिनिटांनंतर तांदूळ हलके हाताने कुस्करून घ्या आणि त्याचे पाणी गाळून वेगळे करा. स्किन-फ्रेंडली राइस वॉटर तयार आहे. एका बाऊलमध्ये २ मोठे चमचे तयार केलेले तांदळाचे पाणी घ्या. त्यात १ चमचा एलोवेरा जेल (Aloe Vera Gel) मिक्स करा. आता यामध्ये १ व्हिटॅमिन ई (Vitamin E) कॅप्सूल फोडून टाका (किंवा त्याऐवजी १ ते २ थेंब व्हिटॅमिन 'ई' ऑईल देखील वापरु शकता.) हे सर्व जिन्नस तोपर्यंत नीट फेटून घ्या, जोपर्यंत त्याला एका 'स्मूद क्रीम' किंवा बामसारखे टेक्श्चर येत नाही. तयार झालेला हा बाम एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

तांदूळ धुवून फेकतो ते पाणीच देईल तुम्हाला उर्फी जावेदसारखा 'ग्लो’! पाहा उर्फी नेमकं काय करते...

होममेड कोलाजन बाम त्वचेसाठी कसा वापरायचा ? 

रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्या. हातावर बामचे २ ते ३ थेंब घ्या. चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने गोलाकार (Circular motion) मसाज करा. हा बाम त्वचेत नीट शोषला जाऊ द्या आणि रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी उठल्यावर कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. नियमित वापरामुळे तुमची त्वचा अधिक मऊ, मुलायम आणि चमकदार वाटू लागेल. 

 कोलाजन बाम वापरण्याचे फायदे... 

१. हा घरगुती कोलाजन बाम तुमच्या त्वचेसाठी एका नॅचरल स्किनकेअर ट्रीटमेंटसारखे काम करतो. हा बाम त्वचेला आतून हायड्रेट करतो आणि पोषण देतो. याच्या नियमित वापरामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे कोरडेपणा, निस्तेजपणा आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्यांची समस्या हळूहळू कमी होते.

२. तांदळाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी त्वचा घट्ट करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचे उघडे पडलेले छिद्र कमी करते आणि त्वचेचा पोत सुधारून नैसर्गिक चमक आणते. 

३. कोरफडमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे आणि जखम भरून काढणारे गुणधर्म असतात. हे त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करते. उन्हामुळे होणारे नुकसान कमी करणे, जळजळ शांत करणे आणि चेहऱ्यावरील फाईन लाईन्स व सुरकुत्या हलक्या करण्यासाठी कोरफड अत्यंत उपयुक्त ठरते.

४. व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट आहे, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते. हे त्वचेला मऊपणा देऊन 'यंग लूक' राखण्यास मदत करते आणि त्वचेच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगवान करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tighten Sagging Skin: Homemade Collagen Balm for a Youthful Glow

Web Summary : Combat sagging skin with a homemade collagen balm. Rice water, aloe vera, and vitamin E combine to hydrate, firm, and reduce wrinkles, revealing younger-looking skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी