चेहऱ्यावर वाफ घेणे हा त्वचेची काळजी घेण्याचा एक अत्यंत जुना आणि पारंपरिक उपाय आहे. त्वचेची स्वच्छता आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी वाफ घेणे अतिशय फायदेशीर ठरते. वाफ घेतल्याने पोअर्स उघडतात, त्वचेत साचलेली घाण निघून जाते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. त्वचेची आतून खोलवर स्वच्छता करण्यासाठी वाफ घेणं हा अतिशय सोपा आणि फायदेशीर उपाय असला तरी, योग्य पद्धतीने वाफ घेणं देखील गरजेचं असत. सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसासाठी फक्त वाफ घेणं पुरेसं नसून वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि वाफ घेताना त्यात घालायच्या गोष्टी यांची माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे(how to take face steam properly).
चुकीच्या पद्धतीने वाफ घेतल्यास त्वचा कोरडी पडू शकते किंवा जळजळही होऊ शकते. योग्य प्रमाणात आणि गरम पाण्यात काही आवश्यक पदार्थ घातल्यास अशी वाफ घेतल्यास त्वचेला अधिक फायदा मिळतो. नुसत्या साध्या पाण्याची वाफ घेण्यापेक्षा त्यात काही नैसर्गिक पदार्थ मिसळले तर त्याचा परिणाम दुपटीने वाढतो. अनेकजण वाफ घेताना काही चुका करतात, ज्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. म्हणूनच, वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि त्यामध्ये वापरायचे दोन 'मॅजिकल' घटक कोणते ते पाहूयात... वाफ घेण्याची योग्य (right way to take face steam) पद्धत आणि वाफ घेताना पाण्यात अशा कोणत्या दोन गोष्टी घालाव्यात ज्यामुळे स्किन ग्लो वाढेल याबद्दल डर्माटॉलॉजिस्ट मनोज दास यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अधिक माहिती दिली आहे(face steam for glowing skin).
डर्माटॉलॉजिस्ट सांगतात वाफ घेण्याची योग्य पद्धत...
सर्वात आधी एका पातेल्यात पाणी घेऊन ते नीट उकळू द्या. पाणी उकळत असतानाच त्यात संत्र्याची साल (Orange Peel) आणि बीटरुटची सालं यांचे छोटे-छोटे तुकडे टाका. हे घटक घातल्यानंतरही थोड्या वेळासाठी पाणी उकळू द्या आणि त्यानंतर पातेले गॅसवरून खाली उतरवा. आता एक जाड टॉवेल घ्या. पातेल्यासमोर बसून आपले डोके आणि पातेले टॉवेलने पूर्णपणे झाकून घ्या, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. वाफ घेताना पातेल्यापासून चेहरा सुरक्षित अंतरावर ठेवावा, जेणेकरून गरम वाफेचा त्वचेला चटका बसणार नाही.
या पद्धतीने वाफ घेण्याचे फायदे...
१. गरम वाफेमुळे त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे त्यातील साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल सहज बाहेर पडते.
२. संत्र्याची साल आणि बीटच्या पानांमधील नैसर्गिक अर्क वाफेच्या रूपाने थेट त्वचेच्या आत जातो. यामुळे त्वचेला नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो. जेव्हा त्वचेला थेट व्हिटॅमिन्स मिळतात, तेव्हा त्वचा जलद गतीने उजळते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येते.
३. या पद्धतीने वाफ घेतल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते. रक्ताभिसरण चांगले असल्यास त्वचा अधिक तरुण आणि निरोगी दिसते.
४. बीटच्या सालांमधील पोषक घटकांमुळे चेहऱ्याला एक हलका गुलाबी ग्लो येतो, ज्यामुळे चेहरा अधिक फ्रेश दिसतो.
आठवड्यातून किती वेळा वाफ घ्यावी?
स्किनकेअर तज्ज्ञांच्या मते, हा विशेष 'फेस स्टीम' उपाय तुम्ही आठवड्यातून ३ वेळा करू शकता. नियमितपणे या पद्धतीने वाफ घेतल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा नेहमी फ्रेश दिसतो. जर तुमची त्वचा अतिशय कोरडी (Dry Skin) असेल, तर वाफ घेताना एक विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. वाफ घेण्यापूर्वी चेहऱ्यावर थोडे मॉइश्चरायझर नक्की लावा. यामुळे वाफेच्या उष्णतेमुळे तुमची त्वचा अधिक कोरडी पडणार नाही आणि मॉइश्चरायझरमधील घटक त्वचेत खोलवर शोषले जातील.
