उन्हाळ्याचे दिवस म्हणजे शाळांना सुट्ट्या. त्यामुळे या दिवसांत बहुतांश कुटूंब हमखास कुठेतरी फिरायला जातात. उन्हाळी सहल आणि दिवाळीच्या सुट्टीमधली सहल बऱ्याच जणांची ठरलेली असते. त्यातही उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या असल्याने आणि या दिवसांत इतर सणवार नसल्याने उन्हाळ्याची ट्रीप जास्त दिवसांची ठरवली जाते. पण यात अशी अडचण येते की या दिवसांत सुर्य अक्षरश: आग ओकत असतो. त्यामुळे अशा उष्ण वातावरणात फिरणं खूप कठीण होतं. उन्हामुळे इतर त्रास तर होतातच, पण त्वचेवरही खूप परिणाम होतो. त्वचा टॅन होऊन काळवंडून जाते. कोरडी पडल्यासारखी दिसते. हे सगळं टाळायचं असेल तर सहलीनिमित्त घराबाहेर पडल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यायची ते पाहुया...(5 tips for skin care routine during summer trips)
उन्हाळी सहलीला गेल्यावर त्ववेची काळजी कशी घ्यावी?
१. उन्हाळी सहलीला गेल्यानंतर आपल्यासोबत एक गोष्ट कायम ठेवायची आणि ती म्हणजे सनस्क्रिन लोशन. चांगल्या दर्जाचं सनस्क्रिन या दिवसांत वापरणं खूप गरजेचं आहे. शिवाय ते दिवसातून एकदाच नाही तर दर ३ ते ४ तासांनी लावा. यामुळे त्वचेला चांगलं संरक्षण मिळेल.
अधिक मास विशेष: जावयाला कोणकोणत्या पदार्थांचे वाण देता येऊ शकते? पाहा पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय
२. ट्रिपला जाताना डोक्यावर गोलाकार हॅट घाला. या हॅटमुळे डोकं तर झाकलं जातंच, पण चेहऱ्यावरही सावली येते. त्यामुळे मग टॅनिंगही थोडं कमी होतं.
३. तुम्ही जिथे कुठे मुक्काम कराल तिथे रात्री झोपण्यापुर्वी ॲलोव्हेरा जेल, गुलाब जल घेऊन त्वचेला मालिश करा. या दोन्ही गोष्टी तुमच्या सोबत असू द्या.
४. हल्ली हॉटेलच्या रुममध्ये मिल्क पावडर, कॉफी पावडर यांचे छोटे छोटे सॅचेट ठेवलेले असतात. त्यांचा वापर तुम्ही त्वचेसाठी करू शकता. सकाळच्या वेळी तयार होऊन घराबाहेर पडण्यापुर्वी मिल्क पावडर, कॉफी पावडर एकत्र करा. त्यात थोडं पाणी घाला आणि याने त्वचेला स्क्रबिंग करा. टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल.
Summer Special: घाम येऊन मान काळी पडली? 'हा' घरगुती उपाय करा- काळवंडलेली मान स्वच्छ होईल
५. भरपूर पाणी प्यायला विसरू नका. त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही. शिवाय बाजारात विकत मिळणारे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा लस्सी, ताक, काेकम, पन्हे असे पारंपरिक पेयं प्या.
Web Summary : Protect your skin on summer trips! Use sunscreen, wear a hat, moisturize with aloe vera, exfoliate with milk powder, and stay hydrated with traditional drinks to avoid tanning.
Web Summary : गर्मी की छुट्टियों में त्वचा की रक्षा करें! टैनिंग से बचने के लिए सनस्क्रीन का उपयोग करें, टोपी पहनें, एलोवेरा से मॉइस्चराइज़ करें, मिल्क पाउडर से एक्सफोलिएट करें और पारंपरिक पेय पदार्थों से हाइड्रेटेड रहें।