हिवाळ्याचे दिवस सुरु झाले की थंडीचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर दिसायला लागतो. सकाळी गरम पाण्याने आंघोळ केली की शरीराला रिलॅक्स वाटते.(Winter skincare after bath) पण यामुळे आपल्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. यामुळे आपली त्वचा कोरडी, ताणलेली, खाजरी आणि निस्तेज दिसू लागते. आपल्यापैकी अनेकजण चेहऱ्यावर क्रीम लावतात.(Skin care tips in winter) पण आंघोळीनंतर त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्वचेच्या समस्या वाढतात. हिवाळ्यात आंघोळीनंतर त्वचेची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. (Glowing skin in winter)गरम पाणी, साबणाचा जास्त वापर, टॉवेलने चेहरा घासणं या छोट्या सवयी त्वचेचं मोठं नुकसान करतात. त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याची गरज नाही.(Winter skin care tips) पण योग्य वेळी योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतली तर चेहरा ग्लो होण्यास मदत होईल.
1. सगळ्यात आधी आपल्याला सकाळी चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यामुळे चेहऱ्यावर साठलेली घाण निघून जाते आणि चेहरा मॉइश्चरायझ होतो. हिवाळ्यात आपण चेहऱ्यासाठी हायड्रेटिंग फेस वॉश वापरु शकतो. यामुळे कोरडेपणा कमी होतो. त्वचेतील ओलावा टिकून राहतो. चेहरा धुतल्यानंतर आपण त्यावर गुलाब पाणी देखील लावू शकतो. ज्यामुळे चेहरा चमकदार आणि मऊ होईल.
2. हिवाळ्यात चेहरा चमकदार ठेवायचा असेल तर दररोज व्हिटॅमिन सी सीरम लावा. यामुळे काळे डाग कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. यानंतर आपण चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता. यामुळे कोरडेपणा टाळता येईल. तसेच आपण चेहऱ्यावर ताजा कोरफडीचा गर देखील वापरु शकतो.
3. अनेकजण उन्हाळ्यात उन्हापासून त्वचेच संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरतात.पण याचा वापर आपण तिन्ही ऋतूमध्ये करायला हवा. हिवाळ्यातही घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. यामुळे टॅनिंग आणि त्वचेचे नुकसान टाळता येते. आपण SPF 30 ते 50 असलेले सनस्क्रीन खरेदी करु शकता.
4. हिवाळ्यात आपण भरपूर पाणी प्यायला हवे. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या कमी होऊ शकते. थंडीच्या दिवसात नियमितपणे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होईल.
Web Summary : Winter dries skin. After bathing, hydrate with face wash, rose water, Vitamin C serum, and moisturizer. Use sunscreen daily and drink water for healthy, glowing skin.
Web Summary : सर्दियों में त्वचा रूखी हो जाती है। नहाने के बाद, हाइड्रेटिंग फेस वाश, गुलाब जल, विटामिन सी सीरम और मॉइस्चराइजर लगाएं। रोजाना सनस्क्रीन का प्रयोग करें और स्वस्थ, चमकदार त्वचा के लिए पानी पिएं।