Join us

उन्हाळ्यात केस आणि त्वचेचा बचाव करण्याचे सोपे उपाय, तब्येत ठणठणीत-पैसेही वाचतील आणि वेळही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:49 IST

Hair Care Tips In Summer : केमिकल्सचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापरही करू शकता. त्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Hair Care Tips In Summer : उन्हाळा आला की, त्वचेसोबतच केसांच्याही वेगवेगळ्या समस्या वाढतात. कारण सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेसोबतच केसांचंही नुकसान होतं. केसगळती, केस तुटणे किंवा केस रखरखीत होणे ही समस्या या दिवसांमध्ये कॉमन आहे. अशात केमिकल्सचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपायांचा वापरही करू शकता. त्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या लेखात केसांसोबत त्वचेची कशी काळजी घ्याल हे जाणून घेऊया.

बाहेर जाताना काय करावं?

या दिवसांमध्ये बाहेर जाणे गरजेचे असेल तर सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडावं किंवा छत्रीचा वापर करावा. प्रखर सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे केस फारच खराब होतात. म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य. उन्हाळ्याच्या दिवसात घामाने आपण सगळेच जण अत्यंत बेजार झालेलो असतो. अशातच महिलांना घामट झालेल्या लांबसडक केसांची काळजी कशी घ्यावी, हा प्रश्न पडलेला असतो. मात्र उन्हाळ्यातही केसांचं सौंदर्य कायम राखण्यासाठी या काही ब्यूटी टिप्स :

केसांची काळजी

1) मेहंदी कंडिशनरचं काम करत असल्यामुळे, केसांचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेहंदी लावायला पाहिजे. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे.

2) बेसन, लिंबाचा रस आणि दही सारख्या प्रमाणात घेऊन केसांची मसाज करून डोकं धुवायला पाहिजे. सर्वात शेवटी केसांना लिंबाच्या पाण्याने धुवावे. त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवावे.

3) 1 वाटी मेंहदीत आवळा, शिकेकाई, रिठा, मेथी, कडूलिंब, तुळशीची पाने 1-1 चमचा घेऊन दह्यात मिश्रित करावे, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून केसांना लावून 1 तास तसेच राहू द्यावे, याने केस मजबूत होतील व केसांना चमक येईल.

4) थोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केस धुवावे. कोरड्या केसांमध्ये वेगळीच चमक मिळेल तसेच ते मुलायम होतील.

त्वचेची काळजी

1) उन्हाळ्यात चेहरा टवटवीत आणि तजेलदार राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी व मध घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावून 10 मिनिटानं धुऊन टाका. त्याने त्वचा सुंदर व ताजी बनेल.

2) डोळ्यांची आग आणि डार्क सर्कल कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्या. काही वेळ काकडीचाही वापर करू शकता. 

3) ओठांना सुंदर व मऊ ठेवण्यासाठी रात्री झोपताना ओठांवर दुधाची साय लावायला पाहिजे, सकाळी थंड पाण्याने ओठ धुवावे.

4) दुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी, ही पेस्ट चेहरा आणि हाता-पायावर लावावी. 10 मिनिटाने हात-पाय आणि चेहरा पाण्याने धुवावा.

5) 8-10 दिवसाने एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर घ्यावी. या पाण्यात पुदीन्याची पानं, तुळशीची पानं, लिंबाचा रस व मीठ घालावे. वाफ घेतल्यानंतर याच कोमट पाण्यात 5 मिनिट हात ठेवावे त्याने हातसुद्धा मऊ होतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स