Join us

केसांना डाय- मेहेंदी नकोच! ४ पदार्थ- अकाली पिकणाऱ्या केसांना करतात काळेभोर, आठवड्याभरात दिसेल कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 12:32 IST

home remedies for premature white hair : how to turn white hair into black naturally: natural ingredients for black hair: काही सोपे घरगुती उपाय केल्यास केस काळे होण्यास मदत तर होईलच. पण केसांचा पोत देखील सुधारेल.

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. या काळात आपण सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारे मेहनत घेतो. पण डोक्यावर असणारे पांढरे केस मात्र आपलं सौंदर्य हिरावून घेतात.(home remedies for premature white hair) कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या काही नवीन नाही. तारुण्याचा काळ सुरु होण्यापूर्वीच अनेकांना पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो.(natural hair darkening tips) २० ते २५ वयातच केस पिकू लागल्यामुळे आपण त्यावर डाय-मेहेंदीचा वापर करतो.(how to turn white hair into black naturally) पण केमिकल्सयुक्त असणारे हे घटक केसांना काळे करण्याऐवजी अधिक पांढरे करतात. ज्यामुळे केसांचा पोत खराब होतो, केसगळती वाढते इतकंच नाही तर केसांच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. (natural ingredients for black hair)पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने पाहायला मिळतात. पण याचा वापर केल्यास आपल्या टाळूचे आरोग्य खराब होते. अनेकजण केसांना मेहेंदी लावतात, पण यामुळे देखील केस काळे होण्याऐवजी ते लालसर होतात. काही सोपे घरगुती उपाय केल्यास केस काळे होण्यास मदत तर होईलच. पण केसांचा पोत देखील सुधारेल. 

लग्न जवळ आलंय पण त्वचेवर तेजच नाही? सोपा उपाय-१५ दिवसांत दिसेल फरक, चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो

केसांना काळेभोर करण्यासाठी आपल्याला २०० मिली एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा हळद पावडर आणि  १ चमचा काळे जिरे किंवा निगेला पावडर इत्यादी गोष्टी लागतील. हे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आपल्याला घरगुती डाय बनवावा लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात कॉफी पावडर, हळद आणि निगेला पावडर किंवा जिरे घाला. २ मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर केसांना लावा. १५ ते २० मिनिटानंतर केस धुवा. केस काळेभोर होण्यास मदत होईल. 

या उपायाने केसांचा रंगच नाही तर त्यांची ताकद वाढेल. केसगळती कमी होते, टाळूतील कोरडेपणा नाहीसा होऊन केसांना नैसर्गिक चमक मिळेल. यामध्ये केमिकल्स नसल्यामुळे केसांना कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. यात असणारे घटक टाळूला थंडावा आणि पोषण देईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : No Dye! 4 Ingredients to Naturally Darken Gray Hair Quickly.

Web Summary : Avoid chemical dyes! Use olive oil, coffee, turmeric, and black cumin to darken gray hair naturally. This home remedy strengthens hair, reduces hair fall, and adds shine without damage. See results within a week.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी