सध्याच्या काळात पर्सनल हायजिन आणि ग्रूमिंगला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. वॅक्सिंग असो किंवा शेविंग प्रत्येक मुलगी, महिला आणि पुरुष देखील नको असणारे केस काढतात. (waxing aftercare) पण यानंतर होणारी खाज, जळजळ, लालसरपणा किंवा छोटे-छोटे पुरळ येऊ लागतात. चालताना, बसताना किंवा अगदी टाईट कपडे घातले तरी देखील आपल्याला त्रास होतो. (wax irritation remedies)खूपदा या गोष्टींकडे लाजेमुळे आपण कुणाकडे शेअर करत नाही. साधा रॅशेस आहे किंवा आपोआप कमी होईल म्हणून गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.(home remedies for waxing rash) पण खरं सांगायचं तर ही खाज किंवा जळजळ तात्पुरता नसते. वेळेत काळजी न घेतल्यास त्वचेला इनफेक्शन होऊ शकतं, फोडं येऊ शकतात आणि दुर्लक्ष केल्यास वेदना वाढतात. या सगळ्यात कॉमन चूक म्हणजे वॅक्सिंग किंवा शेविंग केल्यानंतर टाईट जीन्स, लेग्गिंस किंवा सिथेंटिक अंडरवेअर घालणं.(soothe itching after waxing) यामुळे जास्त घाम येतो आणि खाज वाढते. पण काही सोपे उपाय केल्यास आपल्याला या समस्यांपासून सुटका मिळू शकते. (waxing side effects solutions)
1. वॅक्सिंग केल्यानंतर जळजळ किंवा खाज सुटत असेल तर टी बॅग्जचा वापर करा. यात टॅनिक अॅसिड असते, जे दाहक-विरोधी मानले जाते. टी बॅग्ज पाण्यात भिजवा आणि खाज सुटण्यावर त्वचेवर लावा. यामुळे त्वचा थंड होईल आणि खाज कमी होईल. तसेच लालसरपणा आणि जळजळ कमी होईल.
2. कोरफडीचे जेल त्वचेला आराम देतात. यामुळे खाज कमी होते. वॅक्सिंग केल्यानंतर तासाभराने आपल्या त्वचेवर कोरफड जेल लावा. यामुळे लगेच आराम मिळेल.
3. वॅक्सिंग केल्यानंतर जेव्हा त्वचेचा थेट संपर्क कपड्यांशी येतो. त्यामुळे घाम येणे आणि खाज सुटण्याची समस्या होते. अशावेळी सैल कपडे घाला. तसेच वॅक्सिंग करताना जुने रेझर वापरणे टाळा. यामुळे खाज सुटणे किंवा जळजळ होण्याची समस्या वाढते.
4. या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपाय करणं गरजेचं आहे. बाजारात मिळणारे केमिकलयुक्त क्रीम्स किंवा पावडरचा उलट परिणाम होतो. पण घरच्या घरी असलेल्या काही साध्या आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही ही खाज-जळजळ सहज कमी करू शकता.