केस गळण्याच्या समस्येला वेळीच गांभिर्यानं घेतलं नाही तर नंतर टक्कल दिसायला सुरूवात होते. जास्त ताण घेतल्यामुळे केस गळायला लागतात. काही घरगुती शॅम्पूंचा वापर करून तुम्ही केस गळणं कायमचं थांबवू शकता केमिकल्सयुक्त उत्पादनांऐवजी काही घरगुती उपाय केले तर केसाचं गळणं थांबवण्यास मदत होईल.(How To Stop Hairfall Using Cloves And Rosemerry)
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कढईत लवंग, कलौंजी, मेथीचे दाणे, रोजमेरी मिसळून पाण्यात उकळून घ्यावं लागेल. जेव्हा हे पाणी थंड होईल जेव्हा स्प्रे बॉटलमध्ये भरा. केस धुण्याच्या २ तास आधी केसांवर हा स्प्रे शिंपडा. (Hair Fall Control Tips)
लवंग एका उत्तम जडीबूटीप्रमाणे काम करतो. यात एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे स्काल्प इन्फेक्शन टाळता येतं. स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि केस मजबूत होतात. नियमित याचा वापर केल्यानं कोंडा कमी होतो आणि केस गळण्याची समस्या कमी होते.
कलौंजीमध्ये थायमोक्विनोन नावाचे तत्व असते ज्यामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते यामुळे हेअर फॉल कमी होण्यास मदत होते. केसांना कलौंजी लावल्यानं स्काल्पमध्ये मॉईश्चर टिकून राहतं ज्यामुळे केस कोरडे होत नाहीत आणि खाज येण्याची समस्या उद्भवत नाही. याशिवाय पांढरे केस होण्याची समस्याही होत नाही.
मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते. जे केसांना आतून पोषण देते ज्यामुळे केस तुटणं, केस गळणं, केस पातळ होणं कमी होतं. ज्यामुळे केस सॉफ्ट, स्मूथ आणि शायनी होतात. याशिवाय केसांमध्ये कोंडा होत नाही स्काल्प हेल्दी राहतो.
रोजमेरी केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानली जाते. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे स्काल्पमध्ये ब्लड फ्लो वाढवतात ज्यामुळे केस वेगानं वाढतात केस मुळांपासून मजबूत होतात. पांढरे केस कमी होतात याशिवाय केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो. या तिन्ही घरगुती पदार्थांनी केसांची वाढ व्यवस्थित होते आणि केस गळणं पूर्णपणे थांबवण्यास मदत होईल.
Web Summary : Address hair fall early to avoid baldness. A homemade spray with clove, kalonji, fenugreek, and rosemary can stop hair fall. These ingredients nourish hair follicles, promote scalp health, and boost hair growth.
Web Summary : गंजापन से बचने के लिए बालों के झड़ने की समस्या का जल्द समाधान करें। लौंग, कलौंजी, मेथी और रोज़मेरी से बना एक घरेलू स्प्रे बालों का गिरना रोक सकता है। ये तत्व बालों के रोम को पोषण देते हैं, खोपड़ी के स्वास्थ्य को बढ़ावा देते हैं और बालों के विकास को बढ़ाते हैं।