Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > थंडीत केस खूपच गळतात? मूठभर मेथी-१ आवळा असा लावा, जावेद हबीब यांचं दाट केसाचं गुपित

थंडीत केस खूपच गळतात? मूठभर मेथी-१ आवळा असा लावा, जावेद हबीब यांचं दाट केसाचं गुपित

How To Stop Hair Fall In Winter : केस चांगले ठेवण्यासाठी पार्लरचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:50 IST2025-11-20T15:38:45+5:302025-11-20T15:50:33+5:30

How To Stop Hair Fall In Winter : केस चांगले ठेवण्यासाठी पार्लरचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी सोपे उपाय करू शकता.

How To Stop Hair Fall : Jawed Habib Tips Use Methi And amla To Grow Hairs Naturally | थंडीत केस खूपच गळतात? मूठभर मेथी-१ आवळा असा लावा, जावेद हबीब यांचं दाट केसाचं गुपित

थंडीत केस खूपच गळतात? मूठभर मेथी-१ आवळा असा लावा, जावेद हबीब यांचं दाट केसाचं गुपित

एकदा केस (Hair Fall) गळायला लागले की पुन्हा केस गळती थांबायला जवळपास २ आठवडे लागतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासल्यामुळे केस गळती सुरू होते. केस चांगले ठेवण्यासाठी पार्लरचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी सोपे उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. 

थंडीच्या (Winter care  Tips) दिवसांत केसाचं गळणं थांबवण्यासाठी आवळा आणि मेथी (Amla And Methi) हे दोन पदार्थ तुम्ही वापरू शकता. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी थंडीच्या दिवसांत केस गळत असतील तर केसाचं गळणं थांबवण्यासाठी नैसर्गिक उपाय  सांगितले आहेत. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही. ( Jawed Habib Tips Use Methi And amla To Grow Hairs)


आवळा आणि मेथीचा हेअर मास्क

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी हे दाणे वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये आवळा पावडर किंवा वाटलेले ताजे आवळे आणि लिंबाचा रस मिसळा आणि चांगलं एकत्र करा.तयार झालेलं मिश्रण केसांच्या मुळांपासून आणि संपूर्ण केसांना लावा.

ही पेस्ट अर्ध्या तासासाठी केसांवर तशीच राहू द्या. नंतर  साध्या पाण्यानं किंवा शॅम्पून केस धुवा. मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते जे केसांच्या मुळांना मजबूत करते. आवळ्यातील व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केस गळती कमी करतात.

आवळा आणि मेथीचे तेल

एका भांड्यात खोबरेल तेल घ्या. त्यात मेथीचे दाणे आणि आवळा घाला. हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. मेथी, आवळा तपकिरी होईपर्यंत उकळू द्या. तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि एका बाटलीत भरून ठेवा. आठवड्यातून किमान दोनदा रात्री झोपण्यापूर्वी या तेलानं टाळूची हलक्या हातानं मालिश करा. सकाळी सौम्य शॅम्पूनं केस धुवा.

या तेलामुळे केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण सुधारते. जे केसगळती थांबवते आणि नवीन केस वाढवण्यास मदत करते. आवळा आणि मेथी हे दोन पदार्थ फक्त केसांसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठीही उत्तम ठरतात. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही या पदार्थांचा समावेश करू शकता. 

Web Title : सर्दियों में आंवला और मेथी से बालों का गिरना रोकें।

Web Summary : जावेद हबीब सर्दियों में बालों के झड़ने के लिए आंवला और मेथी का सुझाव देते हैं। इन सामग्रियों को मिलाकर हेयर मास्क या तेल बनाएं। यह जड़ों को मजबूत करता है और बालों के विकास को बढ़ावा देता है, परिसंचरण और बालों के समग्र स्वास्थ्य में सुधार करता है।

Web Title : Stop hair fall this winter with amla and fenugreek seeds.

Web Summary : Jawed Habib suggests amla and fenugreek for winter hair fall. Make a hair mask or oil by combining these ingredients. This strengthens roots and promotes hair growth, improving circulation and overall hair health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.